पुणे : कोरोनाचे संकट अधिक बिकट होत असताना आणि दुधाच्या कमी झालेल्या मागणीमुळे संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने पुनः एकदा कोंडीत पकडले आहे. सरकारने या संकटाच्या काळात सुरू केलेली अतिरिक्त दूध खरेदी योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शेतकरी विरोधी असल्याचे विविध संघटनांनी म्हटले आहे.
कोरोनाच्या काळात राज्य दूध उत्पादक संघ अडथत महानंदने अतिरिक्त दुधाची खरेदी करण्यासाठी एप्रिलमध्ये ही योजना चालू केली होती. या योजनेअंतर्गत ६ कोटी लीटर दूध या काळात संकलित केले. ही सहा कोटी दुधाची मर्यादा संपल्याने ही योजना बंद करत आहोत, असे महानंदतर्फे सांगण्यात आले आहे. ही योजना संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गासाठी एक दिलासा देणारी बाब होती. परंतु ही योजना बंद झाल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोल्हापूर येथील शाहूवाडी येथील शेतकरी अमोल पाटील म्हणाले कि, कोरोनामुळे आमचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. एवढे दूध खरेदी करायला कोणी तयार नाही. संघ पडून दर देतो. अशा परिस्थितीत राज्य सरकार आमचे आशास्थान होते. पण आता ही योजना बंद झाल्याने आमचे अधिकच नुकसान होणार आहे. मागच्या काही दिवसात शेतकऱ्यांनी दुधाला अनुदान देण्यासाठी आंदोलने केली होती. कोल्हापूर, सांगली भागात ट्रकमधून दूध जमिनीवर सोदन्हात आले होते.
Published on: 27 July 2020, 05:59 IST