News

उस्मानाबाद- मागच्या काही महिन्यांपासून कोरोना परिस्थिती तसेच लागणारे लॉकडाउनतसेच निसर्गाचा लहरीपणा म्हणजेच अतिवृष्टी तसेच येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसत आहे.

Updated on 09 January, 2022 9:13 AM IST

उस्मानाबाद- मागच्या काही महिन्यांपासून कोरोना परिस्थिती तसेच लागणारे लॉकडाउनतसेच निसर्गाचा लहरीपणा म्हणजेच अतिवृष्टी तसेच येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसत आहे. 

त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा शेतकरी बंधूंसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने मदतीचा हात पुढे केला आहे. महा ग्रामीण बळीराजा तारणार योजना या बँकेने जाहीर केली असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत कर्जावरील व्याजात  60 ते 70 टक्के घसघशीत सूट देऊन शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत नव्याने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या योजनेचा कालावधी हा 1 जानेवारी ते 31 मार्च 2022 पर्यंत राहणार असून शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र ग्रामीण बँक उस्मानाबाद शाखेचे मॅनेजर विजयकुमार पटके यांनी केले आहे.शेती क्षेत्राने क्षेत्राने कोरोना काळातदेखील उच्च कामगिरी करत अर्थव्यवस्थेला चालना दिली.

त्यामुळे बळीराजा संकटात सापडतो तेव्हा त्याला मदत करण्याचे धोरण ठेवले पाहिजे असं महाराष्ट्र ग्रामीण बँकेने म्हटले आहे. म्हणून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकर्यांच्या थकित कर्जावरील व्याजात 60 ते 70 टक्के घसघशीत सूट देऊन नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचे पाऊल उचलले आहे.

(संदर्भ-नवराष्ट्र)

English Summary: mahagramin baliraaja taaranhaar yojana is crucial for farmer
Published on: 09 January 2022, 09:13 IST