News

सध्या हवामान बदलाचा फटका हा सगळ्याच प्रकारच्या पिकांना बसत आहे. कधी अतिवृष्टी, अवकाळी पावसाचे संकट तर नेहमी डोक्यावरघोगावत असते. त्यामुळे अशा वातावरणीय प्रतिकूल परिस्थितीचा फटका हा शेती पिकांना बसतो व उत्पादनात फार प्रमाणात घट येते.

Updated on 11 January, 2022 5:30 PM IST

सध्या हवामान बदलाचा फटका हा सगळ्याच प्रकारच्या पिकांना बसत आहे. कधी अतिवृष्टी, अवकाळी पावसाचे संकट तर नेहमी डोक्यावरघोगावत असते. त्यामुळे अशा वातावरणीय प्रतिकूल परिस्थितीचा फटका हा शेती पिकांना बसतो व उत्पादनात फार प्रमाणात घट येते.

अशाच प्रकारची वातावरणीय फटकाबीजोत्पादन कार्यक्रम राबवणाऱ्या कंपन्यांनाही बसत आहे. महाबीज  खरीप तसेच रब्बी हंगामातील विविध पिकांचे बियाणे पुरवण्यात प्रथम स्थानी आहे.सोयाबीन पिकाचा विचार केला तर सोयाबीनचे बियाणे महाबीज मोठ्या प्रमाणात पुरवते. परंतु या वातावरण बदलाचा फटका बीजोत्पादन कार्यक्रमाला बसून बीजोत्पादनात देखील घट येत आहे

त्यामुळे महाबीजला बीजोत्पादनासाठी वेगवेगळे पर्याय शोधण्याशिवाय कुठलाही मार्ग शिल्लक नाही त्यामुळे महाबिजणे  बीजोत्पादनाचा कार्यक्रम चक्क उन्हाळ्यात घेण्याचे ठरविले आहे.

 या वर्षी महाबीज कडून राज्यात उन्हाळ्यात 25 हजार हेक्‍टरवर महाबीज कडून  सोयाबीनचे बीजोत्पादन केले जात आहे. सोयाबीन पिकाला अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसून उत्पादनात घट होते. नेमकी पीक काढणीला आले की नैसर्गिक संकट येतात व मालाचा दर्जा खराब होतो. 

याचा फटका बीजोत्पादनाचा देखील बसत आहे. त्यामुळे बीजोत्पादनाचा माध्यमातून दर्जेदार बियाणे मिळवताना मोठे  समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे महाबिजने उन्हाळ्यात बीजोत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी महाबीज ने 25 हजारहेक्टर साठी नियोजन केले आहे.

English Summary: mahabij take seed production programme in summer condition that some reason behind that condition
Published on: 11 January 2022, 05:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)