सोयाबीनचा पेरा वाढावा आणि येणाऱ्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगले सोयाबीनचे पीक हाती यावे यासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. यासाठी महाबीज ने पुढाकार घेतला आहे त्याचाच एक भाग म्हणून परभणी विभागात महाबीज च्या वतीने 6996 हेक्टरवर बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवला जात आहे.
परभणी विभागातील उस्मानाबाद,हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या सहा जिल्ह्यांमध्ये हा बीजोत्पादनाचा कार्यक्रम राबवला जात आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी बियाण्यासाठी सोयाबीनचा पेरा करावा यासाठी महाबीज कडून शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि बोनस दिला जाणार आहे.
परभणी विभागाच्या वतीने 17 हजार 892 हेक्टरवर सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना बियाणे कमी पडू नये हा त्यामागचा उद्देश आहे. यावर्षी ब्यांड आला देखील अतिवृष्टीचा फटका बसला होता. झालेल्या पावसात बियाणे भिजल्याने केवळ 2 लाख 99 हजार 669 एवढे बियाणी अपेक्षित होते.
मात्र दोन लाख सत्तर हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होऊ शकले.त्यामुळे येणाऱ्या खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई शेतकऱ्यांना बसू नये म्हणून बीजोत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदी करताना यंदाच्या खरिपात सोयाबीनला डिसेंबर व जानेवारी महिन्यात बाजार समित्यांमध्ये मिळालेले उच्चतम दर दिला जाणार आहे त्यामुळे शेतकरी या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या उत्पादनात वाढ करू शकणार आहेत.
यासाठी शेतकऱ्यांनी महाबीज कडे नोंदणी करावीलागणार आहे. या दरा सोबतच प्रोत्साहन अनुदान अधिक बोनस या पद्धतीने सोयाबीन बियाण्याला दर दिला जाणार आहे.
बीजउत्पादन कार्यक्रमाला आरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सातबारा,आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स जिल्हा महाबीज कार्यालयात जमा करावी लागणार आहे. त्यानंतरच आरक्षण करून घेतल्या जाणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक ए. एल. सोनोनेयांनी सांगितले आहे.
Published on: 28 November 2021, 03:18 IST