News

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी अशा घटकातील लोकांनी शासनाकडे सातत्याने स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी मागणी करत असायचे.

Updated on 04 February, 2022 10:33 AM IST

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लोकांना आपल्या हक्काचे घर मिळावे यासाठी अशा घटकातील लोकांनी शासनाकडे सातत्याने स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी मागणी करत असायचे.

ही मागणी महा आवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात पाच लाख घरे बांधून त्यांचे उद्दिष्ट प्रति पूर्ण केली असून आता या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी  31 मार्च 2022 पर्यंत पाच लाख घरे बांधण्याचा निश्चय करूया, अशा सूचना ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या आहेत. या अभियानात संदर्भातली बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती तेव्हा बोलताना हसीन मुश्रीफ म्हणाले की, कोरोना काळात देखील महा आवास अभियानाचा पहिला टप्पा यशस्वी रित्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून बेघर लोकांची यादी तयार करण्यात आली होती मात्र त्यांना घरे मिळत नव्हती.अशा गरजू बेघर लोकांना त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळावे यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेमुळे वेळेत घरेतयार करण्याची जिद्द आणि जागृती अधिकार्‍यांमध्ये निर्माण झाली. आणि त्याचाच परिपाक म्हणून पहिल्या टप्प्यात पाचलाख घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण झाला.

 महा आवास अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये काही गुणात्मक व संख्यात्मक बदल करण्यात आला असून त्यामध्ये लँड बँक,सॅन्ड बँक, बहुमजली गृहसंकुले या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. बांधकामाला मंजुरी मिळाल्यानंतर पहिला हप्ता वितरित करण्याचा कालावधी हा 37 दिवसवरून सात दिवसांवर आणावा.

मंजुरी मिळाल्यानंतर घरकुल वेळेत पूर्ण करावीत तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील उर्वरित मंजुरी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, जे लाभार्थी भूमिहीन आहेत त्यांना तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी अशा सूचना देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. घरकुलाला अधिक चालना मिळावी यासाठी केंद्रीय ग्रामविकास विभागाने ड प्लस यादीला मान्यता दिली असल्याने 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत त्यात शंभर टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात यावीज्याघरांचे बांधकाम अपूर्ण आहे अशा घरकुलांचे कामे जलद गतीने पूर्ण करावीत आणि लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरी मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश देखील हसन मुश्रीफ यांनी दिले.

English Summary: mahaawaas abhiyaan second term start 5 lakh house build till 31 march 2022
Published on: 04 February 2022, 10:33 IST