सोलापूर: राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार होते तेव्हा मागेल त्याला शेततळे योजना मोठा गाजावाजा करत संपूर्ण राज्यात राबवली गेली होती. मागेल त्याला शेततळे योजनेसाठी शेतकरी बांधवांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात होते. यानंतर शेतकऱ्यांची कृषी विभागाकडून छाननी केली जात होती आणि पात्र शेतकर्यांना मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत शेततळे खोदण्यासाठी, अस्तरीकरणासाठी व तारेचे कुंपण घालण्यासाठी अनुदान दिले जात होते.
मात्र आता मागेल त्याला शेततळे योजना क्लोज केली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सामूहिक शेततळे योजना अजूनही सुरू आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील एकोणावीस सामूहिक शेततळ्यापैकी सुमारे अकरा शेततळे रद्द केले गेले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
मागेल त्याला शेततळे यां योजनेकडे महाविकास आघाडी सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. सत्तेत आल्यानंतर महा विकास आघाडी सरकारने मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत नव्याने शेततळे मजुरी देणे थांबवले.
एवढेच नाही ज्या शेतकऱ्यांना शेततळे योजनेअंतर्गत अनुदान दिले जाणार होते त्यांना देखील खूप उशिराने अनुदान दिले गेले. यामुळे शेतकरी बांधवांना भीती होती की योजना लवकरच संपुष्टात येणार आहे आणि अगदी शेतकऱ्यांचा भीती प्रमाणेच झाले. मागेल त्याला शेततळे योजना आता महाविकास आघाडी सरकारने बंद केली आहे. मात्र राज्यात अजूनही सामूहिक शेततळे योजना सुरू आहे.
परंतु ही योजना कागदावरती सुरू असल्याचे बघायला मिळत आहे कारण की या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 19 सामूहिक शेततळे यांना मंजुरी देण्यात आली होती मात्र आता या पैकी 11 शेततळे अनुदान मंजुरी रद्द करण्यात आली आहे. उर्वरित सात शेततळ्यांचे कार्य अजून प्रगतीपथावर असल्याचे समजत आहे.
सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत शेततळे खोदण्यासाठी अर्ज केला होता. मात्र अर्ज मंजूर करण्याआधी योजना हाणून पाडली गेली आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
मागेल त्याला शेततळे योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सुरू करण्यात आली होती. मात्र आता या योजनेला महाविकास आघाडी सरकारने ब्रेक लावला आहे. एवढेच नाही सध्या सुरू असलेली सामूहिक शेततळे योजना देखील प्रभावीपणे राबवली जात नाहीये कारण की सोलापूर जिल्ह्यात एका वर्षात केवळ एक सामूहिक शेततळे तयार झाले आहे. यावरून सामूहिक शेततळे योजना फक्त कागदावरच बघायला मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कृषी अधीक्षक कार्यालयाकडे जवळपास 47 हजार शेतकऱ्यांनी शेततळे साठी अर्ज केला होता. यापैकी सुमारे 22 हजार शेतकऱ्यांचे अर्ज देखील मंजूर केले गेले होते. मात्र यापैकी केवळ 12 हजार शेतकऱ्यांचे शेततळे पूर्ण झाले असून उर्वरित सर्व मंजुर शेततळे रद्द केले गेले आहेत.
Published on: 05 April 2022, 12:38 IST