News

अॅग्रीकल्चर टेक्नालॉजी मॅनेजमेंट एजन्सी अंतर्गत मध्य प्रदेश येथील बैतूल जिल्ह्यातील कृषि अधिकारी व शेतकरी यांचा एक अभ्यास गट महाराष्ट्र

Updated on 10 March, 2022 3:47 PM IST

अॅग्रीकल्चर टेक्नालॉजी मॅनेजमेंट एजन्सी अंतर्गत मध्य प्रदेश येथील बैतूल जिल्ह्यातील कृषि अधिकारी व शेतकरी यांचा एक अभ्यास गट महाराष्ट्र दौप्यावर आले असून त्यामध्ये विविध पिकांची माहिती, लागवड तंत्रज्ञान, शासकीय योजना, राज्यातील विद्यापीठाने निर्मित व संशोधन केलेले तंत्रज्ञाना विषयी माहिती घेणे या प्रमुख उद्देशाने 50हून अधिक शेतकर्यांनी जैवज्ञान केंद्र, डॉ.पं.दे.कृ.वि., अकोला येथे भेट दिली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. हि. एम. भाले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. आर. एम गाडे, 

विभाग प्रमुख डॉ. आर. बी. धोराडे, आणि डॉ. एस. बी. साखरे, प्रभारी अधिकारी, जैवतंत्रज्ञान केंद्र तसेच डॉ सुहास मोरे, डॉ डी. र. राठोड पंदे.कृ.वि., अकोला यांच्या प्रमुख पुढाकाराने सदर भेटीचे व अल्प प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान केंद्र येथे विविध प्रकल्प कार्यान्वित असून शेतकरीमुख संशोधन व काळाची गरज लक्ष्यात घेता तसेच माहिती तंत्रज्ञान व जैवतंत्रज्ञान आधारित अनेक विकसित केले जात आहे. 

या केंद्रावर आचार्य व पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या रोजगारयुक्त व बाजाराच्या आवडी निवडीनुसार शिक्षण व प्रशिक्षाये कार्य पार पाडण्यात येते. 

सदरील सर्व तंत्रज्ञान हे आधुनिक काळतील शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त असून शेतकर्‍यांनी असे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. जैवल प्रज्ञामध्ये उनि संवधित पिक तंत्र, जनुकी अभियांत्रिकी तंत्र, जामुकी चिन्हांच्या सहायायाने वनस्पती प्रजनन व पैदाश करणे, पिकांच्या जनुकातील बिघाडांची दुरुस्ती करणे, अतिसूक्ष्मत प्रज्ञान हायड्रोफोनिक्स, फोरोफीनिक्स, जैविक स्थानांतरीत पिके, इत्यादी विषयीची माहिती शेतकर्यांनी घेतली.

येथील उतिसंवर्धन प्रयोगशाळेमध्ये विविध पिकांचे मुख्यनः केळी (ग्रैंडन), (पीडीकेटी वायगाव), करटोली, सर्पगंधा, बांबु, साग, जांभुळ, इत्यादी. यांची निर्मिती करण्यात येते. 

या तंत्राचे प्रात्याशिक शेतकऱ्यांनी बघितले व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

उति संर्वधन तंत्रज्ञान हे खर्चिक असले तरी शेतकरी अल्पदरान बनिसंधित रोपांचे अल्पखर्चिक हरितगृह उभारून त्यांचे बळकटीकरण करू शकतात. प्रत्यक्ष शेताशेजारी हरित गृह निर्मित रोपे उपलब्ध करून विकल्यास , शेतकर्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे नवीन तंत्रज्ञान आधारित फळ पिकांची लागवड मोठ्या क्षेत्रावर करता येते तसेच बाकी गोष्टी वर होणारा खर्च टाळता येते. उतिसंवधित रोपे विकणाऱ्या अनेक खाजगी कंपन्या आहेत. परंतु त्यांचे बळकटीकरण केंद्र (हार्डनिंग सेंटर) फार कमी आहेत. 

सदरील सर्व तंत्रज्ञान हे आधुनिक काळतील शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त असून शेतकर्‍यांनी असे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे अत्यंत आवश्यक आहे. 

अश्या परिस्थितीमध्ये युवक व महिलांनी प्रशिक्षण घेऊन कौशल्य निर्माण केल्यास स्वस्थळी मोठ्या प्रमाणात पोजगार उपलब्ध होतील व शेतकऱ्यांना शासन उत्पन्नाचे जोडव्यवसायाचे साधन सहज निर्माण होईल. जैवतंत्रज्ञान केंद्र व प्रयोगशाळेमार्फत विविध प्रशिक्षण, भेटी मार्गदर्शन विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत मध्यप्रदेश येथील बैतुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चर्चा करूण अल्पप्रशिक्षण घेतले.

तसेच या वेळी विविध पदव्युत्तर विद्यार्थी निखिल रमेश यादव, भावेश अग्रवाल, सचिन तसेच आरती घाटोळे, ईश्वरा देशमुख, तेजस व विविध विद्यार्थी सहकार्यासाठी उपस्थित होते.

English Summary: Madhya Pradesh farmer take biodiversity study
Published on: 10 March 2022, 03:47 IST