News

शेतकरी वर्ग शेतीबरोबरच अनेक जोडव्यवसाय करून आपल्या उत्पादनाचा मार्ग वाढवत आहेत. शिवाय शेती बरोबरच पशुपालन, शेळीपालन, मत्स्यपालन या प्रकारचे अनेक जोडव्यवसाय शेतकरी वर्ग करत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्ग मांसल व्यवसाय सुद्धा करून बक्कळ नफा मिळवत आहे.

Updated on 18 September, 2022 1:58 PM IST

शेतकरी वर्ग शेतीबरोबरच अनेक जोडव्यवसाय करून आपल्या उत्पादनाचा मार्ग वाढवत आहेत. शिवाय शेती बरोबरच पशुपालन, शेळीपालन, मत्स्यपालन या प्रकारचे अनेक जोडव्यवसाय शेतकरी वर्ग करत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्ग मांसल व्यवसाय सुद्धा करून बक्कळ नफा मिळवत आहे.

स्थानिक व्यापारी वर्गाकडून पिळवणूक:-
शेतकरी वर्गाची स्थानिक व्यापारी वर्गाकडून फसवणूक होत आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या सांभाळलेल्या शेळ्या, बोकड, मेंढ्या, पाटी यांची विक्री करण्यासाठी बाजारात गेल्यावर कमी किमतीत मागून व्यापारी वर्गाकडून खरेदी केली जाते त्यामुळे शेतकरी वर्गाला हे परवडत नसे. शिवाय त्याला पर्याय म्हणून आता शेतकरी बांधव आपल्या बोकडांची आणि इतर मांसल प्राणी घरीच कापून नवीन मांसल व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाला यातून बक्कळ नफा मिळत आहे.

हेही वाचा:-गोंदिया जिल्ह्यात 12 हजार हेक्टरवर धानाचे नुकसान, शेतकरी राजा चिंतेत

 

मांसल उत्पादनासाठी आवश्यक:-
सध्या मांसल व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे व्यापारी वर्ग शिवाय शेतकरी बांधव सुद्धा आता हा व्यवसाय करू लागले आहेत मांसल व्यवसायात लागणारे मास हे बोकड, पाट आणि मेंढ्या पासून मिळवले जाते आणि विकले जाते. यातून शेतकरी वर्गाला बक्कळ पैसा मिळत आहे.

मांस उत्पादनासाठी माडग्याळ जातीची मेंढी:-
आपल्या देशातील विविध राज्यात माडग्याळ, मारवाडी, जैसलमेरी या विविध मेढ्यांच्या जाती प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी खूप प्रसिद्ध आहेत. तसेच भारतात शेळीच्या मांस पेक्षा मेंढ्या च्या मांसाला अधिक मागणी आहे.

हेही वाचा:-पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असेल तर मिळेल या सरकारी योजनेतून नुकसान भरपाई.

माडग्याळ मेंढीचे वैशिष्ठ:-
माडग्याळ हे मेंढीचे नाव हे माडग्याळ या गावावरूनच पडल आहे . या मेंढ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे दख्खनी मेंढ्यांपेक्षा या मेंढ्या उंच, लांब, बाकदार नाक, लांब मान रंगाने पांढऱ्या व अंगावर तपकिरी चट्टे अश्या असतात. या मेंढ्यांची शरीर वाढ चांगली असते. बरेचसे मेंढपाळ या जातीच्या नराचा वापर आपल्या कळपात पैदाशीसाठी करतात. शिवाय माडग्याळ नराचे वजन सर्वसाधारण ४० ते ५० किलो, तर मादीचे वजन ३५ ते ४० किलो इतके असते. तसेच जनमलेल्या पिल्लाचे वजन हे 4 किलो पर्यंत एवढे असते आणि 3 महिन्यांच्या कालवधीनंतर याच पिलाचे वजन हे 25 ते 30 किलो या दरम्यान होते.

English Summary: Madgyal sheep beneficial for meat production, read more
Published on: 18 September 2022, 01:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)