Parbhani News :
राज्यात पुन्हा एकादा लम्पी संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. लातूर, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यापाठोपाठ आता परभणी जिल्ह्यात देखील लम्पीने हैदोस घालता आहे. यामुळे पशुपालक चिंतेत सापडले आहेत. यंदा (२०२३) १ एप्रिल ते मंगळवार (ता. २९)पर्यंत लम्पी स्कीन आजारामुळे ४८६ जनावरे दगावली आहेत.
८ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३८३ जनावरे दगावली होती. वासरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. आजवर २९३ वासरे दगावली आहेत अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त दिली.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त म्हणाले की, यंदा १ एप्रिलपासून मंगळवार पर्यंत जिल्ह्यातील २ हजार ३५१ जनावरांना ‘लम्पी’चा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या या आजाराचे जिल्ह्यात ६५२ सक्रिय पशुरुग्ण आहे.
एकूण ४८६ जनावरे जिल्ह्यातील दगावली आहेत. जिल्ह्यातील २ लाख ९५ हजार ८०० जनारांचे लसीकरण करण्या आले आहे. जिल्ह्यात दुसऱ्यांदा लसीकरण पूर्ण झाले. वासरांमध्ये मृत्यू प्रमाण अधिक आहे. उपचारांसाठी पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे.
Published on: 31 August 2023, 12:39 IST