कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील राशिवडेत येथे लम्पी आजाराने थैमान घातले आहे. लम्पीच्या संसर्गामुळे येथील चार जनावरांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लम्पीचा शिरकाव झाल्यानंतर प्रशासनाने उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे लम्पीचा संसर्ग काही अंशी कमी झाला. पण मागील काही दिवसांपासून राधानगरी तालुक्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जनावरांचा मृत्यू होऊ लागला आहे.
गाई, बैल या जनावरांचा अधिक प्रमाणात लागण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यात लम्पीग्रस्त जनावरे आढळली आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात वाढत असलेल्या लम्पीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने तातडीने पावले उचलत लसीकरणाची मोहिम राबवण्याचे काम सुरू केले आहे.
Published on: 29 July 2023, 03:11 IST