News

एकीकडे महागाईने लोकांचे हाल झाले असताना दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. वास्तविक, पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कपात झाल्यानंतर आता व्यावसायिक गॅस सिलिंडरही (LPG Gas Cylinder Price) स्वस्त झाले आहेत.

Updated on 01 June, 2022 1:02 PM IST

एकीकडे महागाईने लोकांचे हाल झाले असताना दुसरीकडे सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. वास्तविक, पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price) कपात झाल्यानंतर आता व्यावसायिक गॅस सिलिंडरही (LPG Gas Cylinder Price) स्वस्त झाले आहेत.

गॅस सिलेंडरची नवीन किंमत

तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, मे महिन्यात सिलिंडरच्या किमतीत 3000 रुपयांपर्यंत वाढ झाली होती. पण आजपासून तुम्हाला व्यावसायिक गॅस सिलिंडरवर 135 रुपयांची सूट दिली जाणार आहे. व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत कपात झाल्यामुळे 19 किलोच्या सिलेंडरची किंमत दिल्लीत 2354 रुपयांऐवजी 2219 रुपये आणि मुंबईत 2306 रुपयांऐवजी 2171.50 रुपये झाली आहे.

याआधी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजीची किंमत 1 एप्रिल 2022 रोजी प्रति सिलेंडर 250 रुपये आणि 1 मार्च 2022 रोजी 105 रुपयांनी वाढली होती.

LPG गॅस सिलेंडरची काय अवस्था आहे

याव्यतिरिक्त, एलपीजीची किंमत मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर अवलंबून असते. जेव्हा हे जास्त होतात, तेव्हा आपल्या देशात एलपीजी सिलिंडरचे दरही वाढतात.

यामुळे, सरकारने गरीब वर्गासाठी गॅस सिलिंडरच्या किमतींवर सबसिडी योजना (LPG Subsidy Yojana) देखील सुरू केली आहे, ज्यामुळे आता नवी दिल्लीतील बहुतांश लोकसंख्येला स्वयंपाकाचा गॅस सहज उपलब्ध झाला आहे.

आज नवी दिल्लीत विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 1,002.50 रुपये आहे. मित्रांनो खरं पाहता भारत सरकार दर महिन्याला सुधारित करतात. एलपीजी हे अत्यंत स्वच्छ इंधन म्हणून ओळखले जाते, म्हणूनच त्याला अधिकाधिक प्राधान्य दिले जाते.

गेल्या काही वर्षांत घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या वापरात झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे या निर्णयामुळे देशातील कोट्यावधी लोकांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जातं आहे. निश्चितचं व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. याशिवाय आता येत्या काही दिवसात लोकांना घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत देखील कपात व्हावी अशी आशा आहे. मात्र याविषयी कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही.

English Summary: LPG Gas Price: On the first day of the month, there was a big change in LPG rules, a big drop in prices.
Published on: 01 June 2022, 01:02 IST