नवी मुंबई: पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमती अनियंत्रित होत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेट कोलमडत आहे. यामुळे मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला कात्री बसत असून गृहिनींचे स्वयंपाकघराचे बजेट देखील कोलमडले आहे. केंद्र सरकारने अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पुरेसे नसल्याचे सांगितले जातं आहे. आता जून महिना सुरू होणार आहे.
अशा स्थितीत 1 जून रोजी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईची झळ बसू शकते. तेल आणि गॅस कंपन्या आढावा घेतल्यानंतरच महिन्याच्या पहिल्या दिवशी दरवाढ जाहीर करतात. तुम्ही एलपीजी सिलिंडरचे ग्राहक असाल तर खरेदीसाठी उशीर करू नका, कारण पुन्हा एकदा किंमती वाढणार आहेत. पुन्हा एकदा सिलिंडरच्या दरात 30 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. 1 जूनपासून एलपीजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने अद्याप एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र काही मीडिया रिपोर्ट्स असा दावा करत आहेत.
7 मे रोजी गॅस सिलिंडर महागला होता
माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, 7 मे रोजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग करण्याचा निर्णय घेतला होता. तेल कंपन्यांच्या या निर्णयानंतर आता दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 999.50 रुपयांवर पोहोचली आहे.
त्यानंतर 19 मे 2022 रोजी पुन्हा घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 3 रुपये 50 पैशांनी वाढ करण्यात आली. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये आठ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 19 मे रोजी देशात घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली होती.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात महिनाभरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. 19 मे रोजी घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने देशभरात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत जवळपास 1000 रुपयांच्या पुढे गेली आहे.
200 रुपये सूट देण्याची घोषणा
खरं तर, 21 मे रोजी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आणि एलपीजी सिलिंडरवर 200 रुपयांची सूट जाहीर केली. हे अनुदान केंद्र सरकार देणार आहे. ही सबसिडी एका वर्षात 12 सिलिंडरवर मिळणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे.
Published on: 29 May 2022, 03:13 IST