गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. असे असताना आता युक्रेन-रशिया युद्धादरम्यान पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमतींदरम्यान 1 मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. सिलिंडरच्या दरात 105 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता महागाईत पुन्हा एकदा भर पडली आहे. याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. यामुळे आता घर खर्चाला पैसे जास्तीचे लागणार आहेत.
असे असताना आता या वाढीमुळे मंगळवारपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,012 रुपये होणार आहे. त्याचबरोबर 5 किलोच्या सिलिंडरच्या दरातही 27 रुपयांची वाढ झाली आहे. आता दिल्लीत 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 569 रुपये असेल. यामुळे या दोन्ही देशातील वादाची झळ आपल्या देशाला बसत आहे. सध्या कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 102 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत.
यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला आहे. ऑक्टोबर 2021 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 170 रुपयांनी वाढ झाली आहे. 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती LPG सिलेंडर स्वस्त किंवा महाग झालेले नाहीत. म्हणजेच घरगुती सिलिंडरच्या किमतीत सध्या कोणताही बदल झालेला नाही. याबाबत बदल झालाच तर याची माहितीत समोर येईल.
देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याला सुधारित केल्या जातात. गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तसेच खाद्यतेलाची किंमत देखील वाढली आहे. यामुळे या युद्धाचे अजून काय परिणाम होणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे. शेती संबंधी औषधे देखील यामुळे वाढणार आहेत. यामुळे याचा शेतकऱ्यांना देखील फटका बसणार आहे.
Published on: 01 March 2022, 12:34 IST