भारतात सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भारत सोयाबीन उत्पादनात व सोयाबीनच्या वापरात दोहो ठिकाणी अव्वल आहे. सोयाबीनचा सर्वात जास्त वापर हा खाद्यतेलासाठी केला जातो त्याचबरोबर सोयाबीनचा वापर हा पोल्ट्री उद्योगात भल्या मोठ्या प्रमाणात होतो. ह्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पोल्ट्री उद्योगातील व्यवसायिकांना माल मिळावा तसेच त्यांना सोयीचे व्हावे म्हणुन सोयाबीनची आयात केली. दिनांक 16 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने 12 लक्ष टन सोयाबीन आयात करण्याची अनुमती दिली.
आयात पूर्व सोयाबीनचे दाम हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते, आयतपूर्व सोयाबीनला चांगला भाव मिळत होता, जवळपास 100 ते 110 रुपये किलोच्या दराने म्हणजे दहा ते अकरा हजार प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीन खरेदी केला जात होता. पण सोयाबीनच्या ह्या विक्रमी दराला ग्रहण लावले ते शासनाच्या ह्या आयात मंजुरीने. केंद्र सरकारने आयात करण्याची परवानगी दिली आणि सोयाबीनचे दर तोंड घासरून पडायला लागले.
सर्वात मोठया सोयाबीन उत्पादक राज्यात 'हा' आहे भाव
भारतात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होते, भारतातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात मध्य प्रदेशाचा समावेश होतो. जवळपास मध्य प्रदेश मध्ये देशातील सर्वात जास्त उत्पादन होते. आणि मध्य प्रदेश राज्यात सोमवारी सोयाबीनचे दर हे हमीभावापेक्षा किती तरी पटीने कमी होते. राज्यात सोयाबीनचा किमान दर हा 2400 रुपया पर्यंत खाली आला आणि शेतकऱ्यांच्या पदरी निराशा देऊन गेला.
ह्याचाच अर्थ सोयाबीनचा जो हमीभाव शासनाने ठरवला आहे तो आहे 3950 रुपये प्रति क्विंटल. आणि ह्या हमीभावपेक्षा कमी भाव सोयाबीनला बाजारात मिळत आहे, मग ही शेतकऱ्यांची पिलवणूक नाही तर काय आहे? असा खोचक आणि वाजवी प्रश्न शेतकरी शासन दरबारीं विचारत आहेत. जेव्हा सोयाबीनचे भाव विक्रमी होते तेव्हा जे लोक बोभाटा करत होते ते आत्ता का काही बोलत नाही असा खोचक सवाल देखील शेतकऱ्यांच्या मनातून ओठांवर येत आहे.
महाराष्ट्रातील सोयाबीनचे भाव
एमपी मध्ये सोयाबीनचे भाव पडले तसेच ते महाराष्ट्रात देखील चांगलेच पडलेत. सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात देखील सोयाबीन उत्पादक शेतकरी सरकारविरोधात असंतोष व्यक्त करत आहेत.
एमपी च्या विदिशा कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला सोमवारी किमान भाव 2400 मिळाला तर कमाल 5150 एवढा मिळाला. महाराष्ट्रात विदर्भात सर्वात जास्त सोयाबीन उत्पादन घेतले जाते. 11 ऑक्टोबर रोजी येथील नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला 3851 रुपये बाजारभाव मिळाला तर अहमदनगर,चंद्रपूर आणि वाणी बाजार समितीत 5641,4000 आणि 4270 रुपये क्रमवारे बाजारभाव मिळाला.
Published on: 13 October 2021, 04:33 IST