नवी दिल्ली: हिंदी महासागराच्या पूर्व भागात तसेच बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या 24 तासात हा दाब वाढणार असून त्यानंतरच्या 12 तासात या भागात वादळ येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात हा पट्टा श्रीलंकेच्या किनाऱ्यावरुन तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचेल, यामुळे येत्या 30 एप्रिल आणि 1 मे ला आंध्रप्रदेश तसेच तामिळनाडूच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या काळात समुद्रही खवळलेला राहील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 26 ते 30 एप्रिल या काळात मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
Published on: 29 April 2019, 07:57 IST