बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा चे रूपांतर आता गुलाब नावाचे चक्रीवादळातझाले असून हे चक्रीवादळ रविवारी सायंकाळी ओरिसा आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकणार असून नंतर हे चक्रीवादळ महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे..त्यामुळे 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान बऱ्यापैकी पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल झाले असून उद्या दक्षिण ओरिसा, छत्तीसगड तसेच आंध्र प्रदेशाच्या समुद्राचा उत्तरेकडील भाग, तेलंगणा, उत्तर छत्तीसगड या राज्यांमध्ये मुसळधार त्यात मुसळधार पाऊस कोसळेल. त
तसेच 27 सप्टेंबर रोजी विदर्भ,दक्षिण छत्तीसगड,ओरिसा,मराठवाडा, तेलंगणा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागात मुसळधार त्याअतीमुसळधार पाऊस कोसळेल. तसेच येत्या सोमवारपासून मध्य प्रदेश,गोवा, राजस्थान आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा रूपांतर गुलाब चक्रीवादळात झाल्यामुळे रविवारी सायंकाळी हे चक्रीवादळ ओरिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात धडकेल.
या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 27 सप्टेंबर पासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
Published on: 25 September 2021, 08:48 IST