News

सोयाबीन, तूर, मूग पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. तसंच पाण्याअभावी पिकांची वाढ देखील खुंटली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

Updated on 02 September, 2023 5:46 PM IST

Solapur News :

ऑगस्ट महिना संपला तरी राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. पावसाअभावी पीके आता सुकण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत. सोलापूर, मराठवाड्याच्या काही भागात पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील पावसाचे प्रमाण कमी आहे.

जिल्ह्यात पावसाने चांगली विश्रांती दिली आहे. यामुळे सोयाबीन, तूर, मूग पिकांचे नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. तसंच पाण्याअभावी पिकांची वाढ देखील खुंटली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.

सोलापूरमध्ये पाण्याअभावी पिकांची स्थिती बिकट झाली आहे. यामुळे पिकांचं नुकसान होण्यास सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी केलेला खर्च देखील वाया जाण्याची भीती आता शेतकऱ्यांना सतावत आहे. तर हा हंगाम जवळपास वाया गेल्याची परिस्थिती आता आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

शेतीबरोबरच जनावरांच्या चाऱ्या आणि पाण्याचा प्रश्न देखील जिल्ह्यात निर्माण झाला आहे. माणसांनाच पाणी मिळत नाही तर जनावरांना कुठून द्यावं, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे. तसंच सरकारने चारा छावण्या सुरु कराव्यात, पाण्याची सोय करुन द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मराठवाड्यात देखील पावसाने विश्रांती दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मराठवाड्याच्या अनेक भागातील पिकांचं देखील नुकसान होतं आहे. यामुळे या भागातील शेतकरी देखील मदतीची मागणी करत आहेत.

दरम्यान, पावसाच्या खंडामुळे पिकांवर त्याचा परिणाम झाला आहे. उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. हे नुकसान ग्राह्य धरून पीक विम्यातून‎नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

English Summary: loss of crops due to lack of water Demand for help from farmers
Published on: 02 September 2023, 05:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)