News

निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात जात असल्याचे सांगितले जात आहे. कालपर्यंत कोकणातील आंबा बागाना वाढत्या उन्हाचा फटका बसत होता तर आज अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने आंबा पिकावर संकटांची मालिका कायम आहे. वाढत्या उन्हामुळे आतापर्यंत आंबा पीक होरपळून जात असून यामुळे आंब्याची गळती सुरू झाली होते.

Updated on 22 March, 2022 12:58 PM IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात जात असल्याचे सांगितले जात आहे. कालपर्यंत कोकणातील आंबा बागाना वाढत्या उन्हाचा फटका बसत होता तर आज अचानक ढगाळ वातावरण तयार झाल्याने आंबा पिकावर संकटांची मालिका कायम आहे. वाढत्या उन्हामुळे आतापर्यंत आंबा पीक होरपळून जात असून यामुळे आंब्याची गळती सुरू झाली होती.

मात्र आता ढगाळ वातावरणामुळे त्यापेक्षाही अधिक गंभीर परिणाम बघायला मिळत आहेत यामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले असून उत्पादनात घट घडणार असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे कोकणातील आंबा पिकासमवेतच इतरही पिकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे फुल शेती फळबागा तसेच रब्बी हंगामातील पिके देखील संकटात सापडले असल्याचे बघायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे आंब्याचा मोहर ज्याप्रमाणे काळवंडतो आहे अगदी त्याचप्रमाणे ज्वारीची कणसे आणि गव्हाच्या लोंब्या देखील काळवंडायला सुरुवात झाली आहे.

तज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात असाने चक्रीवादळाची दस्तक हे ढगाळ वातावरणाचे प्रमुख कारण आहे. या चक्रीवादळामुळेचं महाराष्ट्रात निसर्गाचा लहरीपणा बघायला मिळत आहे. कोकणात याचा परिणाम सर्वाधिक बघायला मिळत आहे.

सकाळपासून कोकणवासीयांना भास्कराचे दर्शन झालं नाही यामुळे जर आंबा पिकाला सूर्यप्रकाश मिळाला नाही तर आंबा पिकाला अजूनही मोठा फटका बसू शकतो आणि आंबा अक्षरशः फुकट विकावा लागेल अशी भीती आंबा बागायतदारांना आहे.

नुकत्याच दोन दिवसांपूर्वी कोकणात तापमानात मोठी वाढ झाल्याने परिपक्व झालेले आंबे होरपळून गळत होते यामुळे आंब्याचा दर्जा खालावला जात होता. मात्र आता या ढगाळ वातावरणामुळे आंबे परिपक्व होण्यापूर्वीच गळून पडत आहेत एवढेच नाही तर आंब्याचा मोहर देखील गळत आहे. यामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल झाले असून उत्पन्नात मोठी घट घडणार असल्याची भीती त्यांना आता भेडसावत आहे.

संबंधित बातम्या:-

चेरी टोमॅटोची लागवड करा आणि मिळवा दर्जेदार उत्पादन; वाचा याविषयी

कापसाला मिळाला 11 हजार 854 रुपये प्रति क्विंटल दर, पण; याचा फायदा फक्त व्यापाऱ्यालाचं

English Summary: Loss of agricultural business due to the vagaries of nature; Now, will the mango be sold at a paltry price?
Published on: 22 March 2022, 12:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)