News

आपण राजकारणात अनेकजण असे बघितले आहेत की, त्यांनी राजकारणासाठी आपली सगळी संप्पती विकली आहे. अशा घटना आपण अनेकदा बघितल्या आहेत. आता मात्र एका राजकारणी व्यक्तीला आपला पराभव सहन झाला नसल्याने उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये शहरी संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जात आहेत. यामध्ये अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

Updated on 18 July, 2022 11:18 AM IST

असे असताना रीवा येथे पराभवानंतर काँग्रेस उमेदवाराचा हार्ट अटॅकने मृत्यू (Congress Candidate Death) झाला आहे. रीवा येथील प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे उमेदवार हरिनारायण यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून अवघ्या 14 मतांनी पराभव (Rewa Municipal Corporation) झाला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही, यामुळे त्यांना अटॅक आला.

त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. हरिनारायण हे अनुमाना मंडळाचे अध्यक्षही होते. नगरसेवक निवडणुकीत त्यांना विजयाची पूर्ण आशा होती, त्यांना आपल्या विजयाची खात्री देखील होती. मात्र हा निकाल त्यांच्या विरोधात लागला, यामध्ये त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यांचा अपक्ष उमेदवाराकडून अवघ्या 14 मतांनी पराभव झाला. ही बातमी ऐकून त्यांना धक्काच बसला.

उद्यापासुन महागाई रडवणार, खाणं-पिणं आणि वैद्यकीय सेवाही महागणार

हरिनारायण यांच्या निधनामुळे त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे निकालानंतर एकच शांतता पसरली. यावेळी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. यामुळे यावेळी मोठा गोंधळ बघायला मिळाला. परिसरात ते काँग्रेसचे एक मोठे नेते होते.

महत्वाच्या बातम्या;
शेतपंप चोरणारांच्या मुसक्या वालचंदनगर पोलिसांनी आवळल्या, सणसरमधून चोरट्यांना अटक
आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही, वाचा नवीन नियम..
आता हायगय करायची नाही! एकदा आमदार,आयुष्यभर पगार, राज्यात 653 माजी आमदार मंत्र्यांना निवृत्ती वेतन

English Summary: losing election, candidate died heart attack, life was lost politics...
Published on: 18 July 2022, 11:18 IST