कोल्हापूर-सांगलीकरांनो कोरोनाला हरवायला लागतयं - राजू शेट्टी

04 September 2020 11:30 PM


राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया चालू झाली आहे. पण कोरोना बाधितांची संख्या मात्र आटोक्यात येताना दिसत नाही. राज्यातून मुंबईत तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. आता पुणे , सांगली, कोल्हापूरमध्ये आकडा वाढू लागला आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेची नेते राजू शेट्टी यांनी सांगलीकर आणि कोल्हापूरकरांना कोरोना हरविण्यासाठी आवाहन केले आहे. 

गेल्या ५ महिन्यापासून आपण आणि आपली अर्थव्यवस्था कोरोना विषाणुशी झुंज देत आहोत.पण कोरोनाची साथ थांबायचं नाव घेत नाही. लॉकडाऊन लावला, संचारबंदी लावली, जमावबंदी लावली, मास्क लावला, सँनिटाईझर वापरलं तरी हा कोरोना कोणतेही नियम न पाळता वाढतच जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोल्हापूर आणि सांगली चे एकूण रुग्ण ४०,००० च्या घरात आहेत. भारतातला कोरोना सध्या तिस-या टप्प्यात आहे, म्हणजे आता सामुदायिक संक्रमणाचा मोठ्या प्रमाणावर विस्फोट होणार आहे.
जर दुस-या टप्प्यातच आपल्याला बेड, व्हेंटीलेटर कमी पडत असेल तर तिस-या टप्प्यात काय होईल याचा विचारही करु नये.. शासन यंत्रणेवर सध्या अतिताण असल्याने, ते तिस-या टप्प्यात किती क्षमतेने चालतील याबद्दल शंका आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मिळुन कोरोनाविरोधात लढणं गरजेचं आहे. पुरात आपण एकमेकांना समर्थ साथ देत लढलो, त्याच पद्धतीने आता कोल्हापूर-सांगलीकरांनो कोरोना थांबवायला लागतोय.

लढाईपुर्वी शत्रूला समजून घ्या
जर आपण कोरोनाला समजून घेतलं तर आपण नक्कीचं कोरोनाचा प्रसार थांबवू शकतो. कोरोनाचा विषाणू , खरतरं फक्त १५ दिवसांचा पाहुणा आहे. एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या नाकातून, तोंडातून आणि हाताचा तोंडा किंवा नाकाशी संपर्क आलेला व्यक्ती आपल्या संपर्कात आला तर होऊ शकतो. बहुतेक वेळा आपली प्रतिकार शक्ती इतर विषाणुंना मारु शकते, पण कोरोनावरील प्रोटीनचे आवरण त्याला प्रतिकार शक्तीला चकवा देत शरिरात शिरण्यास मदत करते.संक्रमण झाल्यानंतर पहिल्या ४ दिवसात कोणतेही लक्षण दिसत नाही, ४-८ दिवसात तो फुफ्फूसांच्या पेशींवर कब्जा करतो.तिथे प्रतिकार शक्ती विषाणूशी लढते आणि याच दरम्यान पेशीभोवती एक आवरण तयार होते, हे आवरण हवेतून आलेला ऑक्सिजन रक्तात मिसळण्यासाठी अडचण करतं. ८-१५ दिवसांमध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी होत जाते,आपलीच प्रतिकार शक्ती संक्रमण झालेल्या विषाणूग्रस्त फुफ्फूसांवर आक्रमण करुन फुफ्फुसांना खराब करायला चालू करते आणि यात पेशंटचा जीव ही जाऊ शकतो.

कोरोनाला हरवायचं कसं ?

वरील गोष्टींवरुन समजतं की पहिल्या ४ दिवसात कोरोना कोणतीही लक्षणं दाखवत नाही आणि याच ४ दिवसात तो इतरांना ही संक्रमीत करण्यासाठी पात्र ठरतो, आपल्याला लक्षणे जाणवण्याआधी तो ३-४ जणांना संक्रमीत करु शकतो, हेच जर थांबवलं तर कोरोना थांबू शकतो. हे थांबवण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन केल्यास अर्थव्यवस्था पुर्णपणे ढासळू शकते, त्यामुळे आता सरकारवर अवलंबून न राहता आपण आपल्याला कोरोना झाला आहे असं समजून उपाय करणे गरजेचं आहे. त्यासाठी

१. घरी दमा,साखर,उच्चरक्तदाब असणारी व्यक्ती असेल तर तीला आत्ताच घरच्याघरी क्वारंटाईन करा.

२.अंगदुखी,ताप,अशक्तपणा,सर्दी, खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांशी फोनवर किंवा व्हाट्सअपवर संपर्क करुन औषध घ्या. दवाखान्यात जाऊन स्वत:ला, डॉक्टरना व इतर पेशंटना धोक्यात घालू नका. २ दिवसात दिलेल्या औषधांनी फरक पडत नसेल तरच डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटा, औषध घेताना विटँमिन सी आणि मल्टीविटँमिन ही देण्याची डॉक्टरांना विनंती करा

३. प्रतिकार शक्ती चांगली असेल तर ती कोरोना संक्रमणाला रोखू शकते. त्यासाठी पपई, किवी, सफरचंद अशा फळांचं सेवन करा.
सकाळी उठल्यानंतर लिंबू चे सेवन केल्यास उत्तम आणि नैसर्गिक व्हिटँमीन सी प्राप्त होऊ शकतो.

४. घराबाहेर जाण्यापुर्वी आणि घरामध्ये आल्यानंतर वाफ घ्यावी, सक्रंमणाच्या लक्षणं न दिसण्याच्या टप्प्यात वाफ घेणे अतिउपयुक्त ठरते.

५. प्रत्येकाला ऑक्सिमीटर घेणे शक्य नसले तरी गल्लीतील तीन-चार कुटुंबीयांनी, म्हणजेच २० व्यक्तींमागे एक ऑक्सीमीटर असावा, जेणे करुन शंका अाल्यास ऑक्सिजन पातळी चेक करुन क्वारंटाईन होता येईल (ऑक्सिजन उजव्या हाताच्या मधल्या बोटावर चेक करावे.)

६. कोरोना झालेल्यापैकी ९५% लोकांना सौम्य लक्षणे दिसतात, ते घरी उपचार घेवून बरे होऊ शकतात. अशावेळी हॉस्पीटल मधले बेड मिळवण्याची धडपड करु नका, तुम्ही घाबरुन हॉस्पीटल मध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर इतर लोकांच्या संपर्कात येऊन त्यांना संक्रमणाचा धोका तर आहेच. पण ज्यांना खरचं बेडची गरज आहे त्यांना अडचण निर्माण होऊ शकते. आपल्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जाऊ नये असं वाटत असेल तर नक्कीच आपण बेडचा अट्टहास न करता घरच्याघरी उपचार करुन घेण्याची विनंती करा.

कोरोना पॉझिटीव्ह येणे हा गुन्हा नाही

बरेच लोक, कोरोना पॉझिटीव्ह येईल या भितीने डॉक्टरकडे न जाता आजार अंगावर काढतात ..असा प्रकार न करता लवकरात लवकर डॉक्टरांशी फोनवरुन अपडेट कळवा, जेणे करुन निदान लवकर होईल.

काहीजण आर्थिक भुर्दंड पडेल या भितीने दवाखान्याला जायचं टाळतात, अशा लोकांसाठी इन्शुरन्स काढून घेणं फायदेशीर राहील आणि आर्थिक चणचण भासणार नाही.

मी ही माझ्या आजार अंगावर काढणा-या कार्यकर्त्यांना वारंवार फोन करुन स्वँब टेस्ट घेण्याची विनंती केली, अशा सात-आठ कार्यकर्त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आणि अशा लोकांवर वेळीच उपचार झाल्याने पुढचा अनर्थ टळला, आपण ही आपल्या आजारी नातेवाईंकाना लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क करण्याची विनंती करा.

मी ही क्वारंटाईन

बरेच लोक माझी सदिच्छा भेट घेण्यासाठी येत असतात, मी विविध कारणांसाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, त्यामुळे माझ्या संपर्कात येऊन आपल्या परिवाराला धोक्यात न घालता, फोनवरुन चर्चा करा, मी उपलब्ध असेन. काल माझी टेस्ट निगेटीव्ह आली, पण काल रात्रीपासून मला थोडा ताप येऊन अस्वथ वाटू लागले म्हणून मी डॉ.अजित बिरनाळे व डॉ.सतीश पाटील यांच्याकडे जाऊन HRCT टेस्ट केली व त्यातून समजले की माझे फुफुस थोड्याप्रमाणात बाधीत झाले आहे ही कोरोना पॉसिटीव्हचीच लक्षणे आहेत, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी घरी राहूनच उपचार घेत आहे , कोरोना मान-सन्मान ठेवत नाही तो सगळ्यांना समान दृष्टीने पाहतो, त्यामुळे माझ्या संपर्कात आल्याने आपण सुरक्षीत राहाल, हा भ्रम मनातून काढून टाका. माझ्या संपर्कात आल्याने दुस-या कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला तर माझ्या मनावर त्याचं ओझं राहील , याची जाणीव ठेवून मी काही काळासाठी स्वत:ला घरी क्वारंटाईन करण्याचं ठरवलं आहे.कृपया आपणही मला या गोष्टीसाठी साथ द्या. 

कोल्हापूर सांगली राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी Raju Shetty कोरोना व्हायरस Coronavirus Swabhimani Shetkari Sanghatana Swabhimani Shetkari Sanghatana leader Raju Shetty
English Summary: lose to Corona raju shetty Appeal to sangli - kolhapurkar

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.