यावर्षी हरभऱ्याच्या दरात भाव वाढण्याचे संकेत दिसत आहेत. सध्या हरभरा ही खातोय ‘मोलाचा’ दर महाराष्ट्र राज्यामध्ये यंदा पाऊस, उष्णता, कीड – रोगांमुळे हरभऱ्याला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी हरभरा दरवाढीचे संकेत दिसत आहेत.
पुरवठा पेक्षा मागणीत घट येत असल्यामुळे त्यामध्ये भाव वाढल्याचे चित्र दिसत आहे. यंदा हरभऱ्याच्या दारामध्ये पाच हजार शंभर रुपये पर्यंत पोहोचण्याचा अंदाजही लावला जात आहे. काही जाणकारांच्या मते हरभऱ्याचा तुटवडा असल्यामुळे सात हजार रुपयांचा उच्चांक देखील गाठू शकतो. परंतु सरकारी धोरणात बदल न झाल्यास हा उच्चांक दिसून येईल.
सध्या हरभऱ्याचे दर 4200 रुपये ते 4800 रुपयांच्या दरम्यान आहे. गेले अनेक वर्ष हरभरा बाजार येण्याच्या सुरुवातीच्या काळात त्याचे दर खूपच कमी होते मात्र मागील वर्षापासून हरभऱ्याला 3500 ते 3600 रुपयापर्यंत चे दर होते. मात्र यंदाच्या वर्षी 4400 ते 5000 भाव असल्याचे दिसून येत आहे. सध्या आवकेचा दबाव वाढत असल्याने हरभऱ्याच्या दरांमध्ये हरभऱ्याच्या दरामध्ये वाढ दिसून येत आहे.
हरभऱ्याच्या दरावर या गोष्टींचा परिणाम होऊ शकतो.
- सरकारने अत्यावश्यक कायदा पूर्ण लागू केल्यास हरभऱ्याच्या दरावर परिणाम होऊ शकतो.
- मटार आयात केल्यास हरभऱ्यावर परिणाम होऊ शकतो
- वायदे बाजारातील नफेखोरीमुळे देखे हरभऱ्याच्या दरावर परिणाम होऊ शकतो.करण्याचे शुल्क कमी केले देखील हरभरा दरामध्ये मध्ये फरक पडू शकतो
- हरभऱ्याच्या दरवाढीमुळे शेतकरी सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे
Published on: 01 July 2021, 06:39 IST