News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने राज्यातील १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे. तसंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करतही माहिती दिली आहे.

Updated on 27 March, 2024 10:01 AM IST

Election Update: देशात लोकसभेच्या निवडणुकाचं बिगुल वाजलं असल्याने सर्वच पक्षाने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. तर महाराष्ट्रात यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने राज्यातील १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटरवरुन ही माहिती देण्यात आली आहे. तसंच शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करतही माहिती दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत उमेदवार जाहीर केले असल्याची माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.

ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी

१) बुलढाणा-नरेंद्र खेडेकर
२) यवतमाळ- संजय देशमुख
३) सांगली -चंद्रहार पाटील
४) हिंगोली- नागेश अष्टीकर
५) छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे
६) मावळ – संजोग वाघेरे- पाटील
७) रायगड – अनंत गिते
८) रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत
९) ठाणे- राजन विचारे
१०) धाराशीव- ओमराजे निंबाळकर
११) शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
१२) नाशिक- राजाभाऊ वाझे
१३) मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई
१४) परभणी- संजय जाधव
१५) मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील
१६) मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत
१७) मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर

English Summary: Lok Sabha Election 2024 Thackeray group gat first list of candidates announced
Published on: 27 March 2024, 10:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)