News

देशातील शेतकऱ्यांवर एकानंतर एक संकट येत आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजापुढे पाकिस्तानमधील आलेल्या टोळांचे संकट उभे राहिले आहे. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा आणि कर्नाटकमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. साधरण २० राज्यांमध्ये टोळांनी आपला हल्ला चढवला आहे.

Updated on 31 May, 2020 9:41 AM IST


देशातील शेतकऱ्यांवर एकानंतर एक संकट येत आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजापुढे पाकिस्तानमधील आलेल्या टोळांचे संकट उभे राहिले आहे. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, तेलंगाणा, ओडिशा आणि कर्नाटकमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. साधरण २० राज्यांमध्ये टोळांनी आपला हल्ला चढवला आहे.  या टोळांनी आतापर्यंत ९० हजार हेक्टरवरील पिके आणि हरित भाग फस्त केला आहे.  दरम्यान संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) एक इशारा दिला आहे.

बिहार, ओडिसापर्यंत हे टोळ पोहोचतील. यासह मॉन्सून वाऱ्यासह हे टोळ जुलैमध्ये परत उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये येतील असा इशारा दिला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील मराठवाडा कृषी विद्यापीठने (Marathwada Agricultural University)  टोळशी दोन हात करण्यासाठी एक शस्त्र सांगितले आहे.  टोळांचे अंडे नष्ट करण्यासाठी आणि पिकांना त्यांच्या पासून वाचविण्यासाठी निंबाच्या  तेलाची फरवाणी करावी असा सल्ला दिला आहे.  साधरण २० राज्यात टोळांनी हल्ला चढवला आहे.  महाराष्ट्राच्या विदर्भातही टोळांनी प्रवेश केला आहे.  मराठवाड्यातील परभणीत असलेल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठानुसार, टोळांचे अंडे नष्ट करणे आणि उभ्या पिकांमध्ये निंबाच्या तेलाची फरवाणी करणे हाच पर्याय योग्य असणार आहे.

विद्यापीठाच्या कृषी कीटकविज्ञान विभागाने या संबंधी शेतकऱ्यांना मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. विद्यापीठानुसार, मादी टोळ ही ओलसर जमिनीत ५० ते १०० अंडी देत असते.  त्यांच्या प्रजनन कालावधी पर्यावरणांवर अवलंबून असतो, आणि ते दोन चार आठवड्यात होत असते. अंड्यातून बाहेर आल्यानंतर लहान टोळ लगेच उडत नाही. यामुळे अंडे नष्ट करणे हा उपाय असू शकतो.  ६० सेंटिमीटर रुंदी आणि ७५ सेंटिमीटर खोलीचा एक खड्डा खोदल्यास त्यात छोट्या टोळ्यांना पकडता येऊ शकते.  मोठे झाल्यानंतर टोळ समूहात उडत असते. यामुळे अंडे नष्ट करणे योग्य पर्याय असेल.  प्रति हेक्टर जमिनीवर २.५ लिटर निंबाच्या तेलाची फवारणी करावी असं विद्यापीठाने सांगितले आहे.  २६ वर्षानंतर टोळांना असा भयानक हल्ला केला आहे. टोळांनी आतापर्यंत ९० हेक्टरवरील पिके नष्ट केली आहेत.

English Summary: Locust Attack : Marathwada Agricultural University suggest medicine on locust
Published on: 30 May 2020, 06:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)