News

किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. एसबीआयच्या ग्राहकांसाठी भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जासाठी नवी ऑफर आणली आहे.

Updated on 13 October, 2020 6:29 PM IST


किसान क्रेडिट कार्डधारकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. एसबीआयच्या ग्राहकांसाठी भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जासाठी नवी ऑफर आणली आहे. ज्या ग्राहकांच्या मोबाईलमध्ये योनो एप असेल तर ते ग्राहक ३ लाखाचे कर्ज त्वरीत मिळवू शकतील.  केंद्र सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजनानुसार शेतकऱ्यांना बँकांमार्फत क्रेडिट कार्ड दिले जाते. त्याचा उपयोग शेतकरी ३ लाख रुपयापर्यंतचे कर्ज घेण्यासाठी करू शकतात. पण अनेक शेतकऱ्यांना हे क्रेडिट कार्ड कसे मिळावे याची माहिती नसते. याविषयीची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत. याशिवाय या कार्डची काय फायदे होतात, हेही पाहणार आहोत.

दरम्यान एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी केसीसीतून कर्ज देण्याची सुविधा पुरवत आहे. ज्या शेतकऱ्यांना एसबीआय बँकेच्या मधून किसान क्रेडिट मिळाले आहे किंवा घेतले आहे. त्या शेतकऱ्यांना एसबीआय योनो या मोबाईल एपच्यामार्फत ३ लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवणार आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांना केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल तर ते बँकेत अर्ज करू शकतात. फक्त सात दिवसांमध्ये एसबीआय बँकेमार्फत शेतकरी किसान क्रेडिट कार्ड घेऊ शकतात.

 


किसान क्रेडिट कार्ड योजना केंद्र सरकारची योजना आहे. योजना बँकांमार्फत चालवली जाते. योजना सन १९९८ मध्ये सुरू करण्यात आली होती.  या योजनेचा उद्देश असा आहे की, खासगी सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांना वाचवणे. परंतु या योजनेच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डला पाहिजे तेवढे महत्त्व दिले नाही. मात्र २०१९ मध्ये पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पंतप्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेनंतर शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्डमध्ये रुची दाखवली आहे. याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेचा फायदा घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड अनिवार्य केले आहे.

या कार्डच्या मदतीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ३ लाख रुपयांचं कर्ज मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकरांकडून कर्ज घेण्याची गरज राहत नाही आणि शेतकरी शेतीसाठी लागणारी साधने घेऊ शकतो. बऱ्याचवेळा शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसतो. अशावेळी केसीसीमुळे आर्थिक समस्या दूर होते. जर आपण एसबीआयचे ग्राहक असाल तर योनो  एपला पीएम किसान क्रेडिट कार्डशी जोडू शकतात.

किसान क्रेडिट कार्डचे फायदे

  • या कार्डद्वारे आपण तीन लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतो.
  • ज्या शेतकऱ्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड घेतले आहे. ते शेतकरी एसबीआय एनआयएच्या द्वारे किसान क्रेडिट कार्ड घेऊ शकतात.
  • या कार्डद्वारे शेतकऱ्यांना कोणत्याही तारणशिवाय दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
  • या कार्डद्वारे ट्रॅक्टर व इतर शेती अवजारे खरेदी करता येतात.

   किसान क्रेडिट कार्ड कसे बनवायचे

 स्टेट बँक ऑफ इंडियाचे किसान क्रेडिट कार्ड आपल्याला हवे असेल तर तुम्ही आपल्या जवळील शाखेला भेट द्यावी. तेथे पीएम किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज करावा. फक्त सात दिवसात आपल्याला किसान क्रेडिट कार्ड मिळेल.

English Summary: Loans up to Rs 3 lakh through SBI Yono app, farmers' financial problems will be solved
Published on: 13 October 2020, 04:19 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)