News

गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या वीज पुरवठयात अनियमितता होत आहे. शेतीसाठी वीज ही एका आठवड्यात दिवसा आणि दुसऱ्या आठवडयात रात्री दिली जाते. रात्र पाळीला शेतात पाणी देणे खूप अवघड आहे. यामध्ये आणखी एक संकट आहे ते म्हणजे, शेतीसाठी आठ वीज दिली जाते.

Updated on 25 February, 2022 4:04 PM IST

गेल्या काही दिवसांपासून शेतीच्या वीज पुरवठयात अनियमितता होत आहे. शेतीसाठी वीज ही एका आठवड्यात दिवसा आणि दुसऱ्या आठवडयात रात्री दिली जाते. रात्र पाळीला शेतात पाणी देणे खूप अवघड आहे. यामध्ये आणखी एक संकट आहे ते म्हणजे, शेतीसाठी आठ वीज दिली जाते. मात्र, या आठ तासात वीज सारखीच येजा करत असते. यावर जिल्हा बँकेने मार्ग काढला आहे.

शेतकरी अडचणीत येत असून शेतकर्‍यांना सोलर बीज पुरवठयाव्दारे पाणी पंप चालवण्याचा उत्तम पर्याय आहे. यासाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोलर पॉवर्ड पंप सिस्टिम करीता मुदतीचे कर्ज देणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन उदय शेळके यांनी दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नगर तालुक्यातील आगडगाव विस्तार कक्षाच्या स्थलांतर प्रसंगी चेअरमन शेळके बोलत होते.

हेहिवाचा : म्हणूच शेतकरी राहतोय वंचित..! कृषी योजनांसाठी फक्त अठरा टक्केच निधी खर्च

जिल्यातील शेतकरी दुष्काळी भागात जरी असला तरी या शेतकर्‍यांना बँकेची नियमित कर्जफेड करण्याची सवय आहे. त्यांच्या प्रगतीत खंडीत व शाश्वत विज पुरवठा नसल्याने अशा प्रगतशील शेतकर्‍यांना सोलर पॉवर्ड पंपाव्दारे शेती करण्यासाठी जिल्हा बँकेने 3 एमपी ते 10 एचपी पर्यत पंपाना 7 ते 10 वर्षाच्या परतफेड कालावधीकरीता योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशाला पर्यावरण संरक्षणाची गरज असून त्यादृष्टीने जिल्हयातील शेतकर्‍यांनी सोलर पॉवर्ड पंप सिस्टिम जिल्हा बँकेच्या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन कानवडे यांनी केले आहे.

English Summary: Loan for solar pump from District Co-operative Bank
Published on: 25 February 2022, 03:58 IST