News

मुंबई: राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 1,284 राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून 8 लाख 55 हजार 513 पशुधन दाखल झाले आहे. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरु केल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी अँड्रॉईड प्रणालीवरील ॲप विकसित करण्यात आले असून त्याचा वापर करण्याचे निर्देश छावण्यांना देण्यात आले आहेत.

Updated on 08 May, 2019 11:06 AM IST


मुंबई: राज्यातील अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, सातारा, सोलापूर, सांगली, जालना, परभणी, हिंगोली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये 1,284 राहत शिबिरे आणि छावण्या उघडण्यात आल्या आहेत. यामध्ये लहान मोठे मिळून 8 लाख 55 हजार 513 पशुधन दाखल झाले आहे. पुणे, सातारा, सांगली आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छेने व स्वखर्चाने सहा छावण्या सुरु केल्या आहेत. या चारा छावण्यांमध्ये पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी अँड्रॉईड प्रणालीवरील ॲप विकसित करण्यात आले असून त्याचा वापर करण्याचे निर्देश छावण्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील छावण्यांमधील पशुधनाच्या आहारामध्येही वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चारा छावण्यांमध्ये दाखल मोठ्या जनावरांना यापूर्वी 15 किलोग्रॅम हिरवा चारा, ऊसाचे वाडे, ऊस दिला जात होता. आता मोठ्या जनावरांना दैनंदिन 18 किलो हिरवा चारा, ऊसाचे वाडे किंवा ऊस दिला जाईल. त्याचबरोबर लहान जनावरांना यापूर्वी 7.5 किलो हिरवा चारा, ऊसाचे वाडे किंवा ऊस दिला जात होता. आता त्यात वाढ करुन 9 किलो दैनंदिन चारा दिला जाईल.

सध्या राज्यातील या छावण्यांमध्ये 8 लाख 55 हजार 513 जनावरे दाखल आहेत. या सर्व छावण्यांमधील दाखल जनावरांपैकी मोठ्या जनावरांसाठी प्रतिदिन 90 रुपये, तर लहान जनावरांसाठी प्रतिदिन 45 रुपये या प्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 35 कोटी निधी उपलब्ध झाला असून चाऱ्यासाठी 25 हजार 99 क्विंटल बियाण्याचे वितरण झाले आहे. गाळपेर क्षेत्रात 17 हजार 465.64 हेक्टर तर शेतकऱ्यांच्या शेतात 41 हजार 355.68 हेक्टर अशी एकूण 58 हजार 821.32 हेक्टर क्षेत्रावर चाऱ्याची पेरणी झाली आहे. यामधून 29.4 लक्ष मेट्रिक टन हिरवी वैरण उत्पादन अपेक्षित आहे.

मदत व पुनर्वसन निधीमधून महसूल व वन विभागाकडून 10 कोटी निधी राहत व चारा शिबिरांकरिता प्राप्त झाला आहे. यामधून उस्मानाबादमधील भगवंत बहुउद्देशीय संस्था, हाडोंग्री, ता. भूम या संस्थेला 238.91 लक्ष, श्री. येडेश्वर गोकुलम गोशाळा दुधाळवाडी, येरमाळा, ता. कळंब या संस्थेला 61.09 लक्ष तर बीड जिल्ह्यातील यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पालवण, ता. बीड या संस्थेला 185.78 लक्ष निधी वितरित केला आहे.

छावण्यातील जनावरांना बारकोड

दुष्काळी भागात शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. यासाठी छावणीमधील जनावरांना बारकोड असलेले टॅग लावण्यात येणार आहेत.

चारा छावण्यांमधील पशुधनाच्या दैनंदिन उपस्थितीच्या नोंदीसाठी कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टिम (Cattle Camp Management System) ही प्रणाली विकसित करण्यात आली असून ती छावणी चालकांना व्यवस्थापनासाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ॲपमध्ये छावणी चालकाला प्रथम छावणीतील पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर बारकोड असलेले टॅग जनावरांच्या कानात लावावे लागणार आहे. छावणीतील जनावरांची दिवसातून एकदा संख्या मोजावी लागणार असून त्यासाठी बारकोड स्कॅन करावे लागणार आहे. या नोंदीनुसारच चारा छावणी चालकांना अनुदान शासनाच्या वतीने दिले जाईल. बारकोड लावणे, ॲपमध्ये जनावरांची व छावणीची माहिती अपलोड करणे यासंबंधीचे प्रशिक्षण छावणी चालकांना देण्यात येणार आहे.

या प्रणालीच्या वापरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात सुरु असलेल्या चारा छावण्यांमधील पशुधनाची दैनंदिन संख्या जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना http://www.charachavani.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

महसूल विभागाच्या मान्यतेने उघडण्यात आलेल्या पशुधन छावण्या:

अ.क्र.

जिल्हा

छावण्यांची संख्या

जनावरांची संख्या

लहान

मोठे

एकूण

1

अहमदनगर

472

40,464

2,55,407

2,95,871

2

बीड

598

31,089

3,75,481

4,06,570

3

उस्मानाबाद

79

5,928

5,038

55,966

4         

लातूर

1

79

773

852

5

औरंगाबाद

4

1,831

1,577

3,408

6

सातारा

19

1,553

9,804

11,357

7               

सोलापूर

92

26,239

20,522

46,761

8

सांगली

2

140

627

767

9

जालना

3

366

1,610

1,976

 

एकूण

1,270

1,07,689

6,15,839

8,23,528


राहत व चारा शिबिरात दाखल पशुधन:

अ.क्र.

जिल्हा

राहत शिबिरांची संख्या

पशुधन संख्या

लहान

मोठे

एकूण

1.

औरंगाबाद

1

5

429

434

2.

जालना

1

50

119

169

3.

परभणी

1

1,254

153

1,407

4.

बीड

1

465

4,086

4,551

5.

उस्मानाबाद

2

1,127

13,264

14,391

6.

अहमदनगर

1

118

449

567

7.

हिंगोली

1

11

25

36

 

एकूण

8

3,030

18,525

21,555


स्वयंसेवी संस्थांनी स्वखर्चाने उघडलेल्या छावण्या:

अ.क्र.

जिल्हा

छावण्यांची संख्या

पशूधन संख्या

लहान

मोठे

एकूण

1.

पुणे

3

113

806

919

2.

सातारा

1

1,061

7,336

8,997

3.

सांगली

1

36

44

80

4.

औरंगाबाद

1

5

429

434

 

एकूण

6

1,215

8,615

10,430

 

English Summary: Livestock registration will be done through mobile application
Published on: 08 May 2019, 07:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)