News

पशुखाद्य तयार करणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात एप्रिल महिन्यात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली होती, त्या नंतर मे महिन्यात पशुखाद्य दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी दरवाढ पाहायला मिळाली होती.

Updated on 18 July, 2021 10:28 AM IST

 पशुखाद्य तयार करणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात एप्रिल महिन्यात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली होती, त्या नंतर  मे महिन्यात  पशुखाद्य दरात दहा ते पंधरा टक्क्यांनी दरवाढ पाहायला मिळाली होती.

 म्हणजे एप्रिल आणि मे ह्या दोन महिन्यातच वीस ते तीस टक्क्यांनी पशुखाद्यात दरवाढ झाली होती. या पशु खाद्य दरवाढीचा फटका पशुपालकांना बसत असून दर दोन-तीन महिन्यांनी खाद्याच्या  दरात वाढ होत असेल तर पशुपालन व्यवसाय कसा करावा असा प्रश्न पशुपालकां पुढे  आहे.

 चार राज्यातील दुधाच्या भावाचा विचार केला तर गाईच्या दुधाला एक रुपये दरवाढ तर म्हशीच्या दुधाला दोन रुपये दरवाढ मिळाले आहे.

. हि झालेली दरवाढ  पाहता दोन महिन्यात 300 रुपयांनी पशुखाद्याची दरवाढ झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना याचा मोठा फटका बसत आहे. शेतकरी शेती व्यवसायात जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात. परंतु दिवसेंदिवस पशुखाद्यात होणारी वाढ, इतर आवश्यक गोष्टीत वाढणारी महागाई तसेच कोरोनाचे संकट व इतर नैसर्गिक संकटे यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. अशातच पशुखाद्यात होणारी दरवाढ ही निश्चितच  शेतकऱ्यांना दिलासा देणारी नाही.

  

पशुखाद्य बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल हा प्रामुख्याने कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यातून येतो. पशुखाद्य बनवण्यासाठी गहू भुसा, डीऑइल राईस  पॅन, मका इत्यादी कच्चामाल म्हणून वापरले जाते. गेल्या तीन-चार वर्षापासून  पशुखाद्याच्या दरांमध्ये लक्षणीय वाढ होत असून त्याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ त्याचा परिणाम हा पशुखाद्याच्या दरवाढ पाहायला मिळते. पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे एका दुधाळ जनावरांच्या खर्च मागे जवळजवळ दहा ते अकरा टक्क्यांनी खर्च वाढतो.

English Summary: livestock feed price growth
Published on: 18 July 2021, 10:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)