News

महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य आहे की लम्पीमुळे दगावलेल्या जनवारांच्या मालकांना आर्थिक सहाय्य करते. लसीकरणाबाबत केंद्र सरकारशी करार करण्यात आला असून पुण्यात लसनिर्मिती सुरु आहे.

Updated on 01 September, 2023 6:27 PM IST

मुंबई

'लम्पी संसर्गजन्य' आजारामुळे मृत झालेल्या जनावरांच्या पशुपालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सध्या सुरु झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळाले नाही त्यांना ही मदत लवकर मिळेल, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Minister Radhakrishna Vikhe-Patil) यांनी विधानसभेत दिली.

महाराष्ट्र हे देशातील एकमेव असे राज्य आहे की लम्पीमुळे दगावलेल्या जनवारांच्या मालकांना आर्थिक सहाय्य करते. लसीकरणाबाबत केंद्र सरकारशी करार करण्यात आला असून पुण्यात लसनिर्मिती सुरु आहे, अशी माहितीही विखे पाटील यांनी दिली आहे.

कशी दिली जाते पशुमालकांना मदत?

दुध देणाऱ्या जनावराचा लम्पीने मृत्यू झाला तर त्या पशुमालकांना ३० हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ओढकाम करणाऱ्या जनावरांच्या पशुपालकांना २५ हजार रुपये, वासरांच्या मालकांना १६ हजार रुपये अशी मदत सरकारकडून केली जाते, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.

 

English Summary: Livestock farmers who died of Lumpy will get financial assistance information about Vikhe Patal
Published on: 20 July 2023, 11:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)