जवस हे देखील एक महत्त्व पूर्ण तेल बी पीक आहे. त्याच्या बियापासून तेल काढले जाते. व्यावसायिक रित्या भारतात या पिकाची लागवड तेल बी म्हणून केली जाते. जवसमध्ये फायबरचा समृद्ध स्त्रोत आहे. जवसच्या तेलामध्ये २०% प्रथिने, ६० % फॅट आणि ४२% कार्बोहायड्रेट असतात. कुक्कुटपालन व पशु आहारामध्ये पोषणाच्या दृष्टीने हा एक प्रथिनांचा मौल्यवान स्त्रोत म्हणून ओळखला जातो.
हवामान -
बियासाठी घेतलेले पीक हे मध्यम थंड हवामानात चांगले येते. या पिकासाठी आद्रता आवश्यक असते.
जाती -
आर- ५५२,किरण, शितल, जवाहर -२३ .
पेरणीची वेळ -
साधारणतः १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान पेरणी केली जाते. लवकर पेरणी केल्यास बुरशीजन्य रोग, तांबेरा रोग आणि जवस पिकावर पडणारे कीड यापासून नुकसान टाळता येते. जवस हे रब्बी हंगामात घेतले जाणारे पीक असून त्याची पेरणी १५ नोव्हेंबर पर्यंत होणे आवश्यक आहे.
बीज प्रक्रिया -
बीज प्रक्रिया करताना थायरम ३ ग्रॅम /किलो, बाविस्टिन १.५ ग्रॅम / किलो आणि टॅप्सिन एम. २.५ ग्रॅम / किलो बियाण्यासाठी बीजप्रक्रिया करावी त्यामुळे बीजजन्य रोगा पासून होणारे नुकसान टाळता येते.
पेरणी अंतर -
ओळी दरम्यान २५ ते ३०सेमी. दोन झाडा दरम्यान ७ ते १० सेमी.
खत व्यवस्थापन -
कोरडवाहू पिकासाठी १० किलो नत्र ,२० किलो स्फुरद ,१० किलो पालाश प्रति एकर द्यावे.
बागायती जवस पिकासाठी २४ किलो नत्र, १२ किलो स्फुरद व १२ किलो पालाश प्रति एकर द्यावे.
पाणी व्यवस्थापन -
पेरणीपासून साधारणतः ४५ दिवसांनी व पेरणीपासून साधारणतः ६५ दिवसांनी पाणी द्यावे.
तण व्यवस्थापन -
पीक ३० दिवसाचे होईपर्यंत एक किंवा दोन वेळा निंदणी करून शेत तणमुक्त ठेवावे.
Published on: 13 November 2023, 04:28 IST