गेल्या काही दिवसांपासून 40 रुपयांपर्यंत गेलेले दुधाचे दर आता 32 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे आता उसाप्रमाणे दुधालाही ‘एफआरपी’प्रमाणे दर द्यायला हवा. अशी मागणी केली जात आहे.
तरच दूध उत्पादकांना हा व्यवसाय परवडेल, अन्यथा नाही, त्यामुळे यापुढे स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
सध्या शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून दूधदरामध्ये सातत्याने कपात होत असल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात वाढ, मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या किती झालीय वाढ..
तसेच ते म्हणाले, आपल्या राज्यातील एका नामवंत अशा खासगी संस्थेच्या चेअरमनचा हस्तक्षेप दूधदर कपातीमध्ये वाढला आहे. त्यांची दादागिरी सुरू आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याचे काम ते करत आहेत.
जगातील सर्वात महाग फळ माहितेय? 1 किलोच्या किमतीत चांगली आलिशान कार येईल, जाणून घ्या..
पण शासनाने याप्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे. त्याचसाठी आपण लवकरच गोपाळपूर ते पंढरपूर अशी दुधाची कावड यात्रा काढणार असल्याचेही ते म्हणाले. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मक्याच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण, शेतकरी अडचणीत..
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती
ऊसदरासाठी स्वाभिमानीचे 1 जुलैपासून आंदोलन, राज्यव्यापी आंदोलनाला रायगडावरून सुरुवात
Published on: 09 June 2023, 11:00 IST