आज आणि उद्या ढगाळ हवामानासह राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगाल उपसागर ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंत मॉन्सूनची आस असलेला पट्टा सक्रिय असल्याने राज्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. दरम्यान अरबी समुद्राच्या वायव्य भागात काही प्रमाणात असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरुन गेली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र फारसे सक्रिय नाही. त्यामुळे राज्यात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे.
दक्षिण उत्तर रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडू दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. राजस्थानच्या वायव्य चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटर या दरम्यान असून हरियाणा आणि पंजाब दिशेने सरकण्याची शक्यता आहे. उत्तर उडीशाच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे तर झारखंडच्या नैऋत्य भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह, उत्तर भारतातील काही भागात हलका ते मध्यम स्वरुपचा पाऊस पडत आहे.
दरम्यान कोकण, विदर्भ व घाटमाथ्यावर आज तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होईल. मध्यम महाराष्ट्रात पावसाचा हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल. मराठावाड्यात उडीप राहिल. उद्या कोकण वगळता राज्यातील अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. रविवारपासून कोकणासह राज्यात हवामानासह पावसाची उघडीप राहील, अशी शक्यता हवामान विभागाने सुत्रांनी वर्तवली आहे.
Published on: 28 August 2020, 10:40 IST