एलआयसी ही विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून नावाजलेले आहे. एलआयसी विविध वयोगटातील व्यक्तींसाठी वेगळ्या प्रकारच्या योजना आणत असते. त्यापैकी एलआयसीची लहान मुलांसाठी असलेली एक योजना म्हणजे जीवन तरुण योजना ही होय. लहान वयाच्या मुलांसाठी एक खास योजना एलआयसीने बनवले आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मुलांच्या बालशिक्षणापासून ते शिक्षण होईपर्यंतच्या मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकता.या योजने विषयी अधिक माहिती घेऊ.
जीवन तरुण योजना
ही योजना विशेष करून तीन ते बारा वर्ष वयोगटातील मुलांसाठी आहे. या योजनेतजगण्याची सुविधा पाच ते 20आणि 24 वर्षे उपलब्ध आहे. या योजनेद्वारे 25 व्या वर्षी परिपक्वता लाभ देण्यात येतो. या योजनेत एकूण चार पर्याय आहेत. त्या एकेक पर्याय ची माहिती घेऊ.
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत घेता येणार योजना
या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या मुलांची नावे पॉलिसी विकत घेऊ शकता आणि विम्याची रक्कम देखील मुलांना दिली जाते. मुलांच्या पालकांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत, परंतु मूळ विश्वासाची होईपर्यंत आपल्याला पोलिसी भरणे आवश्यक असते. परंतु या प्लान मध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे बोनस आणि उर्वरित रक्कम परिपक्वतेच्या फायदा वयाच्या 25 वर्षाच्या वयात दिली जाते. योजना मुलांच्या वयाच्या बारा वर्षापर्यंत घेऊ शकता.
प्रीमियम भरण्याची पद्धत
या योजनांतर्गत तुम्ही दर महिन्याला प्रीमियम भरू शकता. इतकचं नाही तर दर सहा महिन्यांनी आणि दर तीन महिन्यांनी देखील या योजनेचा हप्ता भरता येतो. या योजनेअंतर्गत 2% प्रीमियम वार्षिक मोडमध्येआणि एक टक्के अर्धवार्षिक मोडमध्ये घेता येऊ शकतो. या योजनेद्वारे तुम्ही रोज दीडशे रुपये किंवा महिन्याला साडेचार हजार रुपये जोडून एकूण सात लाख पाच हजार रुपयांचा निधी तयार करू शकता. या योजनेची निश्चित रक्कम 75 हजार रुपये आहे. मुलाचे वय 12 वर्ष गृहीत धरून एल आय सी जीवन तरुण योजनेसाठी गुंतवणूकदारास आठ वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते.
एलआयसीचा पॉलिसी मुदतपूर्ती कालावधीहा तेरा वर्षाचा असतो.जर तुम्ही संबंधित पॉलिसी ची 25 वर्षे पूर्ण केल्यानंतर दिवसाला 130 रुपये प्रिमियम भरला तर तुम्हाला शंभर टक्के एस ए, बोनस आणि एफ एबी सह 2502000 रुपये परतावा मिळतो. या संपूर्ण कालावधीत संबंधित विमाधारकाने एकूण आठ लाख 37 हजार 520 रुपये प्रीमियम भरला. याचा कालावधी वीस वर्ष आहे.
Published on: 21 March 2021, 03:09 IST