News

परभणी: महाराष्‍ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2019 सामाईक प्र‍वेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयाचा विद्या‍र्थ्‍यी सुशांत धनवडे राज्‍यात प्रथम आला असुन महाविद्यालयाचे 17 विद्यार्थ्‍यांचा पहिल्‍या शंभर मध्‍ये समावेश आहे. या यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा निरोप समारोपाचा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 9 एप्रिल रोजी महाविद्यालयात करण्‍यात आले होते.

Updated on 12 April, 2019 7:42 AM IST


परभणी:
महाराष्‍ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2019 सामाईक प्र‍वेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयाचा विद्या‍र्थ्‍यी सुशांत धनवडे राज्‍यात प्रथम आला असुन महाविद्यालयाचे 17 विद्यार्थ्‍यांचा पहिल्‍या शंभर मध्‍ये समावेश आहे. या यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार व अंतिम सत्राच्‍या विद्यार्थ्‍यांचा निरोप समारोपाचा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 9 एप्रिल रोजी महाविद्यालयात करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण हे होते तर प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले, डॉ. डी. एन. धुतराज, डॉ राकेश आहिरे, डॉ. डब्‍लु. एन. नारखेडे, प्रा. संदीप बडगुजर आदींची व्‍यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, कृषी पदवीधरांना सरकारी नोकरीमध्ये कमी संधी असल्‍या तरी कॉर्पोरेट क्षेत्र व कृ‍षी प्रक्रिया उद्योगात मोठया संधी असुन त्‍यांचा शोध घ्‍यावा. एखाद्या परीक्षेत आलेल्‍या अपयशाने नाउमेद न होता, प्रत्‍येक अपयशातुन धडा घेत यशाचा निर्धार केला पाहिजे, असे मत व्‍यक्‍त करून या परिक्षेतील विद्यार्थ्‍यांचे यश हे प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्‍यापकवृंदाच्‍या परिश्रमामुळे हे शक्‍य झाले, असे गौरवोद्गारही त्‍यांनी काढले.

कार्यक्रमात यशस्‍वी विद्यार्थ्‍यांना कुलगुरूच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्‍ताविकात प्राचार्य डॉ. धर्मराज गोखले यांनी गेल्‍या वर्षीही या परिक्षेत परभणी महाविद्यालयाचा विद्यार्थ्‍यी राज्‍यात प्रथम होता, यावर्षी ही परंपरा राखली असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विजयकुमार जाधव, सपना डोडे, अच्‍युत पिल्‍लेवाड यांनी केले तर आभार केशव सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.

महाराष्‍ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळाच्‍या वतीने घेण्‍यात आलेल्‍या कृषी पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रमासाठीच्‍या सन 2019 सामाईक प्र‍वेश परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी कृषी महाविद्यालयाचा विद्या‍र्थ्‍यी सुशांत धनवडे राज्‍यात प्रथम आला असुन ऋषिकेश बोधवड हा पाचव्‍या क्रमांकाने उत्‍तीर्ण झाला आहे. तसेच विनोद ओसावर, कृ‍ष्‍णा हरकळ, प्रिया मगर, स्‍वप्‍नाली भापकर, मोहीनी थिटे, शितल नावडे, शुभांगी कदम, सी अनंथु, लक्ष्‍मण कदम, रवि जाधव, आरती शिकारी, कल्‍पना देशमुख, कार्तिक जाधव, स्‍नेहल इंगले आदी 17 विद्यार्थ्‍यांचा पहिल्‍या शंभर मध्‍ये समावेश आहे.

English Summary: Lessons from failure determination of Success
Published on: 12 April 2019, 07:38 IST