News

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी, राज्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.

Updated on 01 July, 2022 8:53 PM IST

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी, राज्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.मॉन्सून ११ जूनला राज्यात दाखल झाला. त्यानंतर १६ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून मॉन्सूनने पुढील वाटचालीस सुरुवात केली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

पण मराठवाड्याला वगळता इतर भागात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ४५ टक्के कमी पाऊस पडला आहे.पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, सांगली, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. पुणे, सातारा आणि नाशिक घाट परिसरात मंगळवारपासून (ता. २८) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.१ जूनपासून पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)विभाग : सरासरी : प्रत्यक्ष पडलेला : टक्केवारी मराठवाडा : ११४.६ : ११९ : ४कोकण : ५६५.३ : ३७७.८ : उणे ३३मध्‍य महाराष्ट्र : १२९.३ : ७०.८ : उणे ४५विदर्भ : १४१.६ : ८९ : उणे ३७

नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी, राज्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.मॉन्सून ११ जूनला राज्यात दाखल झाला. त्यानंतर १६ जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून मॉन्सूनने पुढील वाटचालीस सुरुवात केली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.

यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पण मराठवाड्याला वगळता इतर भागात आतापर्यंत सरासरीपेक्षा ३० ते ४५ टक्के कमी पाऊस पडला आहे.पुणे, सातारा, कोल्हापूर, ठाणे, सांगली, रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडला आहे. पुणे, सातारा आणि नाशिक घाट परिसरात मंगळवारपासून (ता. २८) पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

English Summary: Less than average rainfall in the state
Published on: 01 July 2022, 08:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)