News

सध्या उन्हाळा सुरू झाला असून तीव्र स्वरूपाचे ऊन जाणवत आहे. अक्षरश: अंगाची लाही लाही करणारे ऊन सध्या पडत असून सहाजिकच लोकांचा कल हा सरबत, उसाचा रस या कडे वळतेय.

Updated on 17 March, 2022 10:21 AM IST

सध्या उन्हाळा सुरू झाला असून तीव्र स्वरूपाचे ऊन जाणवत आहे. अक्षरश: अंगाची लाही लाही करणारे ऊन सध्या पडत असून सहाजिकच लोकांचा कल हा सरबत, उसाचा रस या कडे वळतेय.

उन्हाची काहिली सुरू झाल्याने लिंबूच्या मागणीत वाढ झाल्याने लिंबूचा दर देखील वधारला आहे.यामध्ये मागच्या  आठवड्याचा विचार केला तर 50 रुपये प्रति किलो दर असलेले दर नव्वद ते शंभर रुपयांवर सध्या पोहोचले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. उन्हाळा सुरू झाला म्हणजे लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. अगदी घरात देखील लिंबू ची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. त्यासोबत रसवंती गृह,सरबत तसेच  खाण्यासाठी देखील लिंबू जास्त प्रमाणात वापरला जातो.

 यावर्षी लिंबूच्या उत्पादनात घट

 अवकाळी पावसाचा फटका इतर पिकांना व फळबागांना बसतो तसाच फटका लिंबू फळबाग यांना देखील या वर्षी मोठ्या प्रमाणात बसला आहे.

लिंबू बागांना पालवी फुटायच्या वेळेसच अवकाळी पाऊसझाल्याने पालवी फारच कमी प्रमाणात फुटली व त्याचा परिणाम हा उत्पादनात घट होण्यावर झाला. याचा परिणाम हा लिंबू च्या बाजारपेठेतील आवकेवर होताना दिसत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर वाशी येथील घाऊक बाजारांमध्ये मागच्या वर्षी आंध्र प्रदेश येथून 90 टनांपर्यंत आवक होत होती.परंतु यावर्षी त्यामध्ये घट होऊन अवघे साठ टन आवक होत आहे. म्हणजेच या आकडेवारीचा विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी  आवक मध्ये 50 टक्‍क्‍यांपर्यंत घट झाली आहे. त्याचाच परिणाम हा लिंबूच्या दरवाढीवर झाला आहे. सध्या प्रति किलोचे दर हे नव्वद ते शंभर रुपयांच्या दरम्यान असून किरकोळ बाजारामध्ये एक लिंबू पाच रुपयांवर गेला आहे. 

येणाऱ्या काळात अजूनही लिंबू च्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे.याचा परिणाम हा लिंबू सरबत व्यवसायावर देखील होणार आहे. यामध्ये पाच ते दहा रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. दहा रुपयाला असलेले लिंबू सरबत आता पंधरा रुपयांना मिळत आहे.

English Summary: lemon rate growth in market due to gecrease in production of lemon
Published on: 17 March 2022, 10:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)