राज्यातील शिंदे आणि फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गट अधिक आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं आहेत. आगामी निवडणुकीसाठी हे बजेट शिंदे-फडणवीस सरकारसाठी अत्यंत महत्वाचा मानलं जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथेप्रमाणे काल संध्याकाळी विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण दिले होते. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक विधानभवनात पार पडली. यावेळी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार कपील पाटील, अनिल परब, जितेंद्र आव्हाड, सुनिल प्रभू यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. बैठकीत अधिवेशनाची रणनीती निश्चित करताना सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची माहिती अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी सरकारवर जोरदार टीका करताना अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख घटनाबाह्य मुख्यमंत्री असा केला. शिवाय दिल्लीचे नाव न घेता तेथून येणार्या आदेशाने मुख्यमंत्री कारभार करत असल्याचा आरोप पवार यांनी केला.
काळ्यापाठोपाठ निळ्या गव्हाच्या शेतीमुळे शेतकरी श्रीमंत, आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आहे खूपच मागणी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधी बाकावरील महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. या अधिवेशनातही विरोधकांनी भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्याचे संकेत दिले आहेत.
7 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 5 ट्रॅक्टर, शेतकऱ्यांनो जाणून...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जुनी पेन्शन योजना, विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात दाखल होणारे गुन्हे, पाळत प्रकरण आणि हल्ल्यांचा मुद्दाही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना काय घोषणा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
100 हून अधिक गायींना हेलिकॉप्टरमधून गोळ्या घालणार, धक्कादायक बातमी आली समोर..
नरसू नाईक काळाच्या पडद्याआड, राजू शेट्टी यांचा सहकारी गेला, शेट्टींनी व्यक्त केले दुःख
7 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीचे 5 ट्रॅक्टर, शेतकऱ्यांनो जाणून...
Published on: 27 February 2023, 10:20 IST