News

राज्याचा जसजसा विकास होत आहे त्यासोबतच विकासासाठी,राहण्यासाठी आणि वाढत्या उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी जागेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. परंतु असे प्रकल्प जर एखाद्या शेतीत करायचे असतील तर ते राज्याच्या नियमानुसार करता येत नाही. त्यासाठी अगोदर शेतजमिनीचा नॉन एग्रीकल्चर म्हणजेएन ए करावे लागते. अनेक लोकांना ही प्रक्रिया अजून माहिती नाही. या लेखात आपण एन ए करण्याची प्रक्रिया कशी असते व त्यासाठी काय करावे लागते. याबाबत माहिती घेऊ.

Updated on 30 October, 2021 2:35 PM IST

राज्याचा जसजसा विकास होत आहे त्यासोबतच विकासासाठी,राहण्यासाठी आणि वाढत्या उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी जागेची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. परंतु असे प्रकल्प जर एखाद्या शेतीत करायचे असतील तर ते राज्याच्या नियमानुसार करता येत नाही. त्यासाठी अगोदर शेतजमिनीचा नॉन  एग्रीकल्चर म्हणजेएन ए  करावे लागते. अनेक लोकांना ही प्रक्रिया अजून माहिती नाही. या लेखात आपण एन ए करण्याची प्रक्रिया कशी असते व त्यासाठी काय करावे लागते. याबाबत माहिती घेऊ.

जमिनीचा एन ए कसा करतात?

 महाराष्ट्र जमीन महसूल( कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रुपांतर करणे) अधिनियम 1969 नुसार शेत जमिनीचा वापर इतर कोणत्याच विकास कामाकरिता करता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी हवी असते.

जमीन एन ए करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणारा फार्म भरून त्यावर कोर्टाची पाच रुपयांचा स्टॅम्प
  • संबंधित जमिनीचा सातबारा उताराच्या चार झेरॉक्स
  • जमिनीचा फेरफार उतारा
  • जर तुमच्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर महसूल  अधिकारी तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडून जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र घेणे.
  • जमिनीचा 8अ चा उतारा
  • तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाने दिलेल्या जमिनीचा नकाशा
  • जर इमारतीसाठी एन ए करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनच्या आठ प्रति
  • जर जमीन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे.
  • जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र, शहरी भागात असालतर महानगरपालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र
  • जर जमीन बॉम्बे वहिवाट आणि शेती कायदा 1948 अंतर्गत असेल तर एन ए साठी परवानगी 43/63 नुसार मिळेल
  • जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सोसायटी कडून कोणतेही कर्ज किंवा भरणा नाही हे प्रमाणपत्र आवश्यक
  • जी जमीन एन ए करायचे आहे ते कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठ्याचेपत्र

 जमीन एन ए करताना सरकारला भरावा लागणारा नजराना

  • जर शेतजमिनीचे रहिवासी जमिनीत रुपांतर करायचे असेल तर रेडी रेकनर( थोडक्यात सरकारने ठरवलेल्या भाव) नुसार जमिनीच्या 50 टक्के नजराणा भरावे लागणार
  • जर शेत जमिनीचे निमसरकारी जागेत रूपांतर करायचे असेलतर जमिनीच्या बाजार भावाच्या 20 टक्के नजराणा भरावे लागणार.
  • जर शेतजमिनीचे व्यावसायिक जमिनीत रुपांतर करायचे असेल तर जमिनीच्या बाजार भावाच्या 75 टक्के नजराणा भरावा लागणार.
  • जर रहिवासी एनए असेल तर तिचे औद्योगिक मध्ये रुपांतर करायचे असेल तर जमिनीच्या किमतीच्या 20 टक्के नजराना भरावा लागतो.

जमिनीच्या एनए साठी अर्ज कसा करावा

  • जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा.
  • अर्ज मिळाल्यावर जिल्हाधिकारी सात दिवसात तहसीलदारांना अर्ज पाठवतात.
  • तहसीलदार संबंधित अर्जाची छाननी करतात
  • तहसीलदार तोच व्यक्ती जमिनीचा मालक आहे की नाही हे पाहतात, तलाठ्याकडून जमिनीची चौकशी करून घेतात.
  • तहसीलदार हे जमीन एन ए झाल्यानंतर कोणत्या पर्यावरणीय अडचणी किंवा कोणत्या प्रकल्पाला धोका असणार नाही ना हे पाहतात.
  • ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जमीन रूपांतराची ऑर्डर किंवा आदेश काढतात.
  • त्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची एनए अशी नोंद होते.
English Summary: legal process of agriculture land transfer in non agriculture land
Published on: 30 October 2021, 02:35 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)