News

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदारांना सोबत घेऊन सर्वात मोठे बंड केले. या सर्व बंडाचे जायंट किलर एकनाथ शिंदे ठरले. या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं.

Updated on 06 September, 2022 10:20 AM IST

मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदारांना सोबत घेऊन सर्वात मोठे बंड केले. या सर्व बंडाचे जायंट किलर एकनाथ शिंदे ठरले. या बंडामुळे महाविकासआघाडी सरकार कोसळलं.

एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीतीत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याचा ट्रिगर पॉईंट कोणता होता, ठिणगी नेमकी कुठे पडली, याबाबत एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर राणे कुटुंबाच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक

'ट्रिगर पॉईंट विचारत असाल तर ट्रिगर रोजच दाबला जात होता. गोळी सुटायची आणि कोणीतरी शहीद व्हायचं. ही 50 लोकंच माझ्या मागे लागली होती,' असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, '2019 ला महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना युतीला कौल दिला होता. बाळासाहेब आणि मोदींचे फोटो लावून आम्ही निवडणूक लढलो. पण निवडणुकांनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.

महाविकास आघाडीचा प्रयोग आमच्यातल्या अनेक आमदारांना मान्य नव्हता, पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे कार्यकर्ते, त्यामुळे आम्ही नेतृत्वाचा निर्णय मान्य केला,' असं शिंदे म्हणाले. 'महाविकासआघाडीमध्ये शिवसैनिकाला त्रास दिला जात होता. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं.

आनंदाची बातमी: शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी सरकार देतंय 3 लाख रुपयांपर्यंत अनुदान

आमच्याच मतदारसंघामध्ये जाऊन आमचे घटकपक्ष भूमिपूजन करत होते. बाळासाहेबांची भूमिका, हिंदुत्व याची गळचेपी होत होती, हे आम्हाला जाणवत होतं,' असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं.

आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर आमच्यावर 50 खोके वगैरे टीका करतात, पण आम्ही जी 50 लोक आहोत ती किती वर्ष शिवसेनेत आहोत. आम्ही 25-30, 40 वर्ष शिवसेनेसाठी काम केलं आहे. आमच्यावर टीका करणाऱ्यांचा अनुभव किती आहे? 50 खोके बोलतात त्यांना तो बोलण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे.

Amit Shah: मुंबईवर फक्त भाजपचं वर्चस्व राहिले पाहिजे; उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा

English Summary: Left with Uddhav Thackeray? Finally Eknath Shinde said the real reason
Published on: 06 September 2022, 10:20 IST