सध्याचे तरुण यांनी शेती करायचे म्हटले त्यांच्यासमोर उभा राहतो तो कष्ट, शेतीतील तोटे. त्यामुळे बरेच जण गावाकडे शेती न करता शहराची वाट धरतात. परंतु याला काही तरुण अपवाद आहेत. यातीलच एक तरुण म्हणजे अक्षय चौगुले.
अक्षय चौगुले यांचा गाव राधानगरी असून त्यांनी इंजिनिअरिंगची नोकरी सोडू घरच्यांच्या च्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रात नवनवे प्रयोग करणे सुरू केले आहे. अक्षय या यशाबद्दल या लेखात माहिती घेऊ.अक्षय यांच्या घरच्यांचा वडिलोपार्जित शेती हा व्यवसाय आहे. म्हणून साहजिकच अक्षयला शेतीची आवड होती. अक्षय यांनी 2012 -13 साठी बारावी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते एका खासगी कंपनीत नोकरीला लागले. परंतु म्हणतात ना आपल्या आवडीचे काम जोपर्यंत करायला संधी मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्या कामांमध्ये मन रमत नाही. अक्षय यांचेही तसेच झाले.
आमचे नोकरीत मन रमत नव्हते. मनोज चालू नोकरी सोडून त्यांनी तंत्रज्ञान, अभ्यासपूर्ण शेती करण्याचा निर्णय घेतला. शेती करायला प्रत्यक्षात सुरुवात केल्यानंतर त्यांनी ग्रींहाऊस च्या साह्याने जरबेरा फुलांची शेती केली. ति त्यांनी साधारणत पाच वर्षे केली. अवघ्या दोन गुंठ्यात जरबेरा ची शेती करून त्यांनी लाखोंचे उत्पन्न मिळवले. त्यानंतर ऊस झेंडू जातीची पिके घेतली. तसेच नवीन ठेवून शेवंतीच्या झाडांची सुद्धा लागवड केली.
हेही वाचा : मोगरा शेती तंत्रज्ञान ; एकदा लागवड केल्यानंतर दहा वर्ष घ्या उत्पन्न
अक्षय यांच्या लक्षात आले की तांत्रिक साधनांवर भर देऊन शेतीत फेरबदल केले. तर शेतीचा पोत वाटतो आणि पुढे येणारे पीक जास्त नफा मिळवून देते. त्यामुळे त्यांनी आपल्या अभ्यासाच्या आणि तंत्रज्ञान च्या मदतीने विविध प्रकारची पिके घेण्यास सुरवात केली. व्यावसायिक दृष्टिकोनातून नवनवीन प्रयोग करून त्यांनी लोक डाऊन दरम्यान रोपवाटिका सुद्धा सुरू केली. रोपवाटिकेची सुरुवात करण्याअगोदर त्यांनी विविध ठिकाणच्या रोपवाटिका भेटीतून अभ्यास केला. या भेटींमधून त्यांनी निरीक्षण आणि अभ्यास करून विविध प्रकारच्या हायटेक करून सरीमधून लागवड कशी केली जाते याचे निरीक्षण केले. अभ्यास पूर्ण केल्यानंतर लोक डाऊन दरम्यान त्यांनी स्वतःची रोपवाटिका सुरु केली.
या रोपवाटिकेमध्ये उसाची रोपे लावून हळूहळू त्यांचे प्रमाण वाढवत नेली. एवढेच नाही तर रोपवाटिकेमध्ये खरेदी करायला येणाऱ्या शेतकऱ्यांना रोपे खरेदी केल्यापासून त्यांची वाढ, त्यासाठी लागणारी खते, फवारणी कशी करावी ते स्वतः मार्गदर्शन करतात. तसेच विविध हंगामानुसार ते विविध प्रकारच्या पालेभाज्या आणि फळे यांची रोपे तयार करून त्यांची विक्री करतात. कोबी, फ्लावर, मिरची अशी विविध भाज्यांची रोपे तयार करतो. याबद्दल माहिती देताना अक्षय म्हणतात की, थोडे कष्ट आणि त्यानंतर नफा या सूत्राने मी काम करतो.
रोपवाटिकेच्या माध्यमातून त्यांनी गेल्या पाच ते सहा महिन्यात लाखांचा व्यवसाय केला आहे. याआधीही मी अनेक नवीन प्रयोग करून शेतीतून लाखो रुपये मिळवले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की तंत्रदृष्ट्या अभ्यासपूर्ण शेती केली तर ती तोटा होण्याची शक्यता खूपच कमी असते. असे अक्षय यांनी सांगितले.
Published on: 19 February 2021, 11:56 IST