News

अनेक बँका मोठ्या उद्योगपतींना कर्जासाठी कोणतीच आडकाठी करत नाही त्याची परतफेड जरी नाही झाली तर त्यांना इतका त्रास बँकेकडून दिला जात नाही. याबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्राला (Bank of Maharashtra) खडेबोल सुनावले आहे.

Updated on 17 May, 2022 3:41 PM IST

आपण बघतो की आपल्या देशात अनेक शेतकरी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या करतात. असे असले तरी मोठ्या लोकांना मात्र याबाबत त्रास दिला जात नाही. ते आरामात जगत असतात. यामुळे शेतकऱ्यांवर वाईट दिवस येत आहेत. अनेक बँका मोठ्या उद्योगपतींना कर्जासाठी कोणतीच आडकाठी करत नाही त्याची परतफेड जरी नाही झाली तर त्यांना इतका त्रास बँकेकडून दिला जात नाही.

याबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्राला (Bank of Maharashtra) खडेबोल सुनावले आहे. मोठमोठी कर्जे न फेडणाऱ्यांवर तुम्ही काही कारवाई करत नाहीत. मात्र गरीब शेतकऱ्यांच्या तुम्ही मागे लागता. त्यांना पिडता. अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने बँक ऑफ महाराष्ट्राला सुनावले आहे.

मध्ये प्रदेशमध्ये हे प्रकरण समोर आले आहे. मोहनलाल पाटीदार या शेतकऱ्याने एकरकमी भरपाईचा प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्रला दिला होता. यावर बँकेने न्यायालयाचा दरवाजा ठोठवला. यावर मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांची बाजू घेत निकाल दिला. या निर्णयाच्याविरोधात बँकेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यामुळे या प्रकरणाची देशात चर्चा आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही बड्या धेंडांच्या मागे लागत नाही. मात्र ज्या गरीब शेतकऱ्याने ९५ टक्के कर्ज फेडले आहे त्यांना तुम्ही पिडता. या शेतकऱ्याने कर्ज काढले व नंतर ३६.५० लाखांपैकी ९५.८९ टक्के रक्कम एकरकमी भरणा योजनेंतर्गत आवश्यक मुदतीत भरली. तरी देखील बँक त्याला त्रास देत होती, अखेर हे प्रकरण कोर्टात गेले.

महत्वाच्या बातम्या;
बातमी कामाची! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनो कांदा बिहार केरळमध्ये विका, व्हाल मालामाल...
खतांबाबत शेतकऱ्यांची चिंता मिटली, खरीप हंगाम आढावा बैठकीत अजितदादांचा मोठा निर्णय
'आज आरती केली येणाऱ्या काळात भरणे मामांच्या नावानं शांती करणार'

English Summary: Leaving the big people and the farmers suffering, the court slapped the Bank of Maharashtra
Published on: 17 May 2022, 03:41 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)