News

आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. तसेच आपल्या देशाच्या जीडीपी मध्ये कृषी विभागाचे मोठे योगदान आहे. सुमारे 18 टक्के वाटा हा देशाच्या आर्थिक तिजोरीमध्ये कृषी क्षेत्रातून जात आहे. या मुळे राज्यसरकार तसेच केंद्र सरकार शेतीच्या विकासासाठी आणि उत्पादन वाढीसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. जेणेकरून शेतीचा विकास व्हावा आणि त्याचबरोबर उत्पादन सुद्धा दुप्पट व्हावे या उद्देशाने सरकार शेतीवर अधिक लक्ष्य देत आहे. याचबरोबर किसान सन्मान योजना, पीक विमा योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकरी वर्गाला मदत करत आहे.सरकारने शेतकरी वर्गासाठी आणखी एक नवीन योजना राबवली आहे ती म्हणजे स्माम योजना. या स्माम योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला नवीन अवजारे खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला नवीन अवजारे खरेदी करण्यासाठी 50 ते 80 टक्के पर्यँत अनुदान दिले जाणार आहे.

Updated on 11 April, 2022 3:45 PM IST

स्माम योजनेचा लाभ नेमका कोणासाठी:-

स्माम योजनेचा लाभ हा देशातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो. ज्या शेतकरी बांधवांला अवजारे खरेदि करण्याची आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून 50 ते 80 टक्क्यांपर्यंत अनुदान सरकार कडून मिळेल तसेच महिला शेतकरी सुद्धा या योजनेचा फायदा  घेऊ  शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  केवळ  आपल्या  नावावर  जमिनीचा  सातबारा  असणे  आवश्यक आहे.शेतीची अवजारे महाग असल्यामुळे शेतकरी ती घेऊ शकत नाही तसेच शेतीमधून उत्पादन वाढावे म्हणून सरकार शेतकरी वर्गाला मदत म्हणून  सरकारने  स्माम  ही योजना राबवली आहे.

अश्या प्रकारे योजनेचा लाभ घ्यावा:-

स्माम योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्यांदा https://agrimachinery.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन लॉगिन करणे आवश्यक आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑपशन वर क्लिक  करून त्यामध्ये फार्मर हा पर्याय निवडावा. हे केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज येईल त्या पेज वर तुम्ही तुमचे नाव, आधारकार्ड, आणि मोबाईल नंबर टाकावा आणि विचारलेली माहिती अचूक भरून घ्यावी. सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यावर शेवटी जमा म्हणजेच सबमिट या बटनावर क्लिक करावे.

आवश्यक कागदपत्रे:-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी या शेतकरी बांधवांकडे ही आवश्यक कागदपत्रे असणे खूप गरजेचे आहे त्यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा,मोबाईल नंबर, जातीचा दाखला, आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.

English Summary: Learn Smam Smam Kisan Yojana, up to 80% discount on new equipment purchase
Published on: 11 April 2022, 03:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)