सध्या राज्यातील पशुपालकामध्ये चिंतेचे प्रमुख कारण म्हणजे जनावरांवर लम्पी स्कीन (Lumpi Skin ) या आजाराचा प्रादुर्भाव. राज्यातील अहमदनगर, जळगाव, अकोला, धुळे, पुणे, औरंगाबाद, लातूर ,बीड , सातारा, सांगली, कोल्हापूर, यवतमाळ, उस्मानाबाद, परभणी, सोलापूर, अमरावती, बुलढाणा ई. जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. लम्पी त्वचा रोग हा केवळ गोवंश व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरतो.
या आजाराची लक्षणं काय आहेत आणि पशुपालकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याबाबतची माहिती पाहुयात.Let's see the information about what exactly should be taken care of by the animal husbandry...या आजाराची प्रमुख लक्षणे कोणती?
हे ही वाचा - पंजाबराव डख यांचा पावसाबाबत अंदाज, सप्टेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी होणार अतिवृष्टी
1) आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळयातून व नाकातून पाणीयेते.2) सुरवातीस ताप येतो.3) दुधाचे प्रमाण कमी होते.4) चारा खाणे, पाणी पिणे कमी होते.5) हळूहळू डोके, मान, मायांग, कास इ.भागाच्या त्वचेवर 10-50 मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात.6) तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो.
7) डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येतात.8) डोळ्यांची दृष्टी बाधित होते.9) पायावर सूज येवून काही जनावरे लंगडतात.लम्पी स्कीन बाधित जनावर खालील फोटोप्रमाणे दिसतात अशी लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.शेतकर्यांनी घ्यावयाची काळजी● लम्पी त्वचा रोग हा संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे रोग येऊच नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या.● रोग आल्यास त्याचा प्रसार होऊ नये याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.● बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची व्यवस्थित स्वच्छता राखावी.● निरोगी जनावरांना बाधित जनावरांपासून वेगळे बांधावे.
● जनावरामध्ये रोग सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुखांना तातडीने संपर्क साधावा.● बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व तसेच चराईकरिता स्वतंत्र व्यवस्था करावी.● बाधित परिसरात स्वच्छता करावी व निर्जंतुक द्रावणाची परिसरात फवारणी करावी, याकरिता १ टक्का फॉर्मलीन किंवा २ ते ३ टक्के सोडियम हायपोक्लोराइटचा वापर करावा.● या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी 8 फूट खोल खड्डयात गाडून विल्हेवाट लावावी.● बाधित क्षेत्रात गाई म्हशींची विक्री, पशू बाजार इ. बंद करावे.● आपल्या जनावरांची वेळीच काळजी घेतल्यास आपल्या जनावाराला लम्पी आजारा लागण होण्यापासून वाचविता येईल.
संकलन
प्रा. महेश देवानंद गडाख
( विवेकानंद कृषि महाविद्यालय हिवरा आश्रम, बुलढाणा)
Published on: 12 September 2022, 09:14 IST