चांगल्या दर्जाचे गुळाचे उत्पादन व्हावे यासाठी गुळाची नोंदणी व त्याचा दर्जा याबाबत नियमावली असणे आवश्यक आहे.पण ही नियमावली तयार करताना ती जाचक नसावी,अशी अपेक्षा गुळ उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सरकारने खांडसरी व गूळ उद्योगावर कायद्याच्या अंकुश करण्याबाबत काही हालचाली सुरू केल्या आहेत.या पार्श्वभूमीवर गुळ उद्योग क्षेत्रातून ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सध्या बऱ्याच ठिकाणी भेसळीचे प्रमाण वाढले आहे. त्याला गुळ उद्योग क्षेत्रही अपवाद नाही. अशी भेसळ करणार्यांच्या विरोधात कायद्याचा धाक हवाच अशी ठाम भूमिका गुळउत्पादक संघाचे आहे. परंतु अशी कुठल्याही प्रकारचे कायदे लागू करताना शासनाने गूळ उत्पादकांशी अशी चर्चा करावी जेणेकरून गुळ उत्पादकांच्या समस्या शासनाला कळतील.
असा मतप्रवाह गुळ उत्पादकांचा आहे. या बाबतीत कायदा करताना जर शासनाने गुळ उद्योगावर जाचक अटी लादल्या तर यामधून गुळउद्योगाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नेमकी शासन गुळ उद्योगासाठी नियमावली तयार करताना कोणता नेमकेपणा आणणार त्याची चर्चा उत्पादकांशी करून या उद्योगाबाबत निर्णय व्हावेत असे उत्पादकांचे म्हणणे आहे. इतर उद्योगांशी कुठल्याही प्रकारची तुलना न करता गूळ तयार होणाऱ्या भागातून चांगला गूळ तयार होईल अशी अपेक्षा शासनाने ठेवून नियमावली तयार करावी, अशा पद्धतीचे मागणी उत्पादकांचे आहे.
शासनाने गुळ उद्योगाकडे एक उद्योग म्हणून न पाहता एक ब्रँड विकसित करण्यासाठी आवश्यकत्यानियमावली तयार कराव्यात. जेणेकरून या उद्योगात घडणारे वाईट प्रकार होणार नाहीत अशी अपेक्षा गुळउत्पादकांनी व्यक्त केली.शासनाने गुळ उद्योगाकडे एक उद्योग म्हणून न पाहता एक ब्रँड विकसित करण्यासाठी आवश्यकत्यानियमावली तयार कराव्यात. जेणेकरून या उद्योगात घडणारे वाईट प्रकार होणार नाहीत अशी अपेक्षा गुळ उत्पादकांनी व्यक्त केली.
Published on: 30 January 2022, 09:21 IST