News

दुबईमध्ये भारतीय शेतकऱ्यांना संयुक्त अरब अमिरातीतील खाद्य कंपन्यांशी जोडण्यासाठी एक कृषी व्यापार मंच स्थापित करण्यात आला आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Updated on 28 August, 2020 2:32 PM IST


दुबईमध्ये भारतीय शेतकऱ्यांना  संयुक्त अरब अमिरातीतील खाद्य कंपन्यांशी जोडण्यासाठी एक कृषी व्यापार मंच स्थापित करण्यात आला आहे.  कारण कोरोना व्हायरसमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वाहतुकीचे साधन नसल्याने अन्न पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. यामुळे अरब देश आपली अन्न सुरक्षा वाढविण्याच्या प्रयत्नात आहे.दुबई मल्टी कमोडिटीज सेंटरच्या व्यासपीठावर, आर्गीओटा आणि भारताच्या क्रॉपडाटा तंत्रज्ञानासह विकसित करण्यात आले आहे. धान्य, डाळी, तेलबिया, फळे, भाज्या आणि मसाल्यांचा व्यापार वाढण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.

आर्गीओटाच्या माहितीपत्रकानुसार, मोठ्या प्रमाणात खरीददारांशी थेट संपर्क साधणे आता सोपे होणार आहे. ही कृषी वस्तू बाजारपेठ आहे. यामुळे बरेच शेतकरी या उपक्रमात जोडले जातील आणि त्यांना याचा भरपूर फायदा मिळेल. यूएई भारतामधून मोठ्या प्रमाणात मांस, मेंढ्यांचे मांस, कोळंबी, मासा, कांदे, काजू, गहू, तांदूळ, साखर इत्यादी वस्तुंची आयात करतो. यामुळे दोन्ही देशातील मैत्री संबंध सुद्धा सुधारण्यास मदत होतील. युएई त्यांच्या मोठ्या प्रमाणात अन्न, वैद्यकीय, ग्राहक आणि औद्योगिक पुरवठा आयातीवर अवलंबून आहे. रखरखीत हवामान यामुळे पीक आणि पशु यासाठी यूएई दुसऱ्या देशावर अवलंबुन आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यापासून अरब देशाने पुरवठ्यात अखंडित प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.  कोविडच्या काळात जगभरातील अन्न  पुरवठा  रोखला गेला होता. भविष्यात याप्रकारचे संकट येण्याआधीच यूएई सावध झाले आहे.

English Summary: Launch of Agri Trading Platform, an Indian commodity for sale in Dubai
Published on: 28 August 2020, 02:32 IST