News

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Updated on 02 September, 2023 10:39 AM IST

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये उपोषण करत असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी तीव्र लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

यामुळे आंदोलकांनी आक्रमक होऊन पोलिसांवर दगडफेक सुरु केला. यामध्ये काही आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावाला भेट देणार आहेत. तसेच अंबड रुग्णालय भेट देऊन जखमींची विचारपूस करणार आहेत.

शरद पवार हे आज साडेअकरा वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर ते साडेबारा वाजता अंबड रुग्णालयाला भेट देतील. तसेच वादीगोदरी हॉस्पिटलला देखील भेट देतील. यावेळी ते आंदोलनादरम्यान जे आंदोलक जखमी झाले आहेत, त्यांची विचारपूरस करणार आहेत.

काळ्या हळदीपासून मोठी कमाई, जाणून घ्या त्याचे औषधी गुणधर्म..

त्यानंतर शरद पवार हे आंदोलन सुरु असलेल्या अंतरवली सराटी गावाला देखील भेट देणार आहेत. त्यानंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे.

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्माण झाली होती.

ब्रेकिंग! पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणुक लढवणार.? रणनीती आखली...

त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने विरोध झाला. पोलीस आणि आंदोलक यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला.

तसेच आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

पॉलिहाऊसमध्ये गुलाबाची लागवड करा आणि कमवा जास्तीचे पैसे

English Summary: Lathi charge on Maratha protestors, Sharad Pawar planned a direct visit to Jalna, will meet the injured protestors today...
Published on: 02 September 2023, 10:39 IST