News

भारताच्या गानकोकिळा म्हणून जगात विख्यात असलेल्या लता मंगेशकर यांच्या निधनाने (Death of Lata Mangeshkar) संपूर्ण देश मोठ्या दुःखात आहे. वयाच्या 92 व्या वर्षी भारताच्या गानकोकिळा (Singers of India) यांनी अखेरचा श्वास घेतला.

Updated on 06 February, 2022 12:47 PM IST

भारताच्या गानकोकिळा म्हणून जगात विख्यात असलेल्या लता मंगेशकर यांच्या निधनाने (Death of Lata Mangeshkar) संपूर्ण देश मोठ्या दुःखात आहे. वयाच्या 92 व्या वर्षी भारताच्या गानकोकिळा (Singers of India) यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रकृती अचानक बिघडल्याने लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात लता दीदी वर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली यामुळे संपूर्ण भारत वर्षात दुखाचे सावट पसरले आहे. गानकोकिळाच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्व पोरका झाल्याच्या भावना कला क्षेत्रातून प्रकट होत आहेत. आठ जानेवारी रोजी लतादीदी यांना कोरोनाचे (Corona) सौम्य लक्षणे दिसत होती, त्याअनुषंगाने दीदींना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट करण्यात आले होते. लतादीदींना निमोनियाची लक्षणे देखील असल्याचे स्पष्ट झाले होते. लता दीदी यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते.

मात्र 28 तारखे नंतर लतादीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आणि म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. मात्र पुन्हा पाच फेब्रुवारीला त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र अखेर भारताची गानकोकिळा देशाला पोरके करून आपल्याहून निघून गेली. भारताच्या गानकोकिळाने आपला अखेरचा श्वास सोडला आणि संपूर्ण कलाविश्ववर शोककळा आली. भारतीय राजकारणातून, समाजकारणातून, सिनेसृष्टीतून भावुक श्रद्धांजली देण्यात आली. भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी गाणकोकिळेच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईत दाखल होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईत आज 4 वाजून 30 मिनिटांनी दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.

लतादीदीवर आज सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईच्या शिवाजी पार्कात दीदींवर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

English Summary: lata mangeshkar passed away pm modi arrives in mumbai for funeral
Published on: 06 February 2022, 12:47 IST