पावसाळा सुरु झाल्यानंतर अनेकदा आपण बघतो की अनेक गोष्टीचे बाजार कमीजास्त होत असतात. यामुळे अनेकदा याचा फायदा होतो, तर काहीवेळेस याचा तोटा देखील होतो, आता मात्र घर बाधणारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पावसाळ्याचा पहिला परिणाम बांधकाम क्षेत्रावर (Construction area) होतो. गेल्या महिनाभरात देशातील विविध शहरांमध्ये बारचे दर प्रतिटन 4,500 रुपयांनी महागले आहेत. मात्र अजूनही बार, सिमेंट आणि विटा (Bars, cement and bricks) अत्यंत कमी किमतीत उपलब्ध आहेत.
यामुळे हे दर पुन्हा वाढण्याआधी तुम्हाला याबाबत काही खरेदी करायची असल्यास तुम्ही लवकरच याची खरेदी करा. या वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात बांधकाम साहित्याच्या किमती (Prices of construction materials) उच्च पातळीवर होत्या. त्यानंतर बार, सिमेंट या साहित्याच्या किमतीत मोठी घसरण झाली. विशेषत: बारचे दर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सातत्याने कमी होत गेले. यामुळे अनेकांनी खरेदी देखील केली.
दरम्यान, बारच्या बाबतीत भाव जवळपास निम्म्यावर आले होते. जून महिन्यात मान्सूनचे आगमन होताच त्यांचे भाव पुन्हा वाढू लागले. यानंतर बारची किंमत वेगाने वरच्या दिशेने जात आहे. परंतु तरीही तुम्हाला अजूनही स्वस्तात बार खरेदी करण्याची संधी आहे. आपण बघितले की, मार्च महिन्यात काही ठिकाणी बारची किंमत 85 हजार रुपये प्रति टनापर्यंत पोहोचली होती, तर आता ५० ते ६० हजार रुपये प्रति टन या दरात बार उपलब्ध होत आहेत.
जूनमध्ये तर तो 44 हजार रुपये प्रति टनपर्यंत खाली आला होता. या महिन्याच्या सुरुवातीला ब्रँडेड बार (Branded bars) ची किंमत 80-85 हजार रुपये प्रति टनपर्यंत खाली आली होती, जी मार्च 2022 मध्ये 01 लाख रुपये प्रति टनपर्यंत पोहोचली होती. Ironmart वेबसाइट बारच्या किमतीच्या हालचालींवर लक्ष ठेवते आणि त्या आधारावर किमती अपडेट करते. गेल्या महिन्यात मुंबई (Mumbai) हे एकमेव शहर आहे जिथे बारची किंमत स्वस्त झाली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
२०२३ पर्यंत बटाटे आयात करण्यास परवानगी, दर कोसळण्याची शक्यता
Citroen C3 कारचे बुकिंग भारतात सुरू, अनेक दिवसांची प्रतीक्षा होणार पूर्ण..
जमीन फक्त २ बिघा, उत्पन्न ५ लाख, राजेंद्रराव करतात तरी काय, जाणून घ्या..
Published on: 06 July 2022, 11:29 IST