1. बातम्या

बाजार समितीत डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक, भाव दबावात

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यामध्ये १०२४४ क्विंटल डाळिंब या फळाची आवक झालेली आहे, जास्तीत जास्त डाळिंबाची आवक वाढल्यामुळे दर भावात दबाव राहिलेला आहे. या बाजार समितीमध्ये मृदुला वाणास ३०० ते ८५०० सरासरी ला ५७५० रुपये दर मिळाला आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
pomegranate

pomegranate

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या आठवड्यामध्ये १०२४४ क्विंटल डाळिंब या फळाची आवक झालेली आहे, जास्तीत जास्त डाळिंबाची आवक वाढल्यामुळे दर भावात दबाव राहिलेला आहे. या बाजार समितीमध्ये मृदुला वाणास ३०० ते ८५०० सरासरी ला ५७५० रुपये दर मिळाला आहे.

चालू आठवड्यामध्ये उन्हाळा कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण दिसून आलेली आहे जसे की १२४७९ क्विंटल आवक झाल्याने कांद्याला प्रति क्विंटल ४५० ते १८११ तर सरासरी १३७० रुपये भाव आलेला आहे. तसेच बटाट्याची आवक ५१७२ क्विंटल झालेली आहे जो की प्रति क्विंटल ४०० ते १४०० तर सरासरी ७६० रुपये दर राहिलेला आहे. लसणाची आवक १३८ क्विंटल झाली असून त्यास प्रति क्विंटल भाव २७०० ते ८५०० भेटला असून सरासरी भाव ५५०० रुपये भेटला आहे, आल्याची आवक ९४८ क्विंटल झाली असून त्यास प्रति क्विंटल २५०० ते ३५०० भाव भेटला असून सरासरी भाव ३००० रुपये भेटला आहे.

सरकारच्या दुर्लक्षपणामुळे पीकविमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेना - विखे पाटील

तसेच या आठवड्यामध्ये काही फळ भाज्यांची आवक कमी झाली आहे तर काही फळ भाज्यांची आवक जास्त प्रमाणात झालेली दिसून येत आहे त्यामुळे भाव कमी मिळाला आहे. वालपापदी व घेवड्याच्या भाजीची आवक ३७७६ क्विंटल झाली असून यांच्या किमतीमध्ये घट झालेली दिसत आहे जसे की वालपापडी ला २५०० ते ३००० प्रति क्विंटल दर भेटला असून सरासरी दर २८०० रुपये मिळाला आहे तसेच घेवड्याच्या भाजीला प्रति क्विंटल ५ ते ६ हजार दर भेटला आहे जे की सरासरी दर ५५०० रुपये मिळाला आहे. हिरव्या मिरचीची आवक २११६ क्विंटल झाली असून लवंगी मिरचीला प्रति क्विंटल १५०० ते २५०० रुपये दर भेटला आज तर सरासरी दर २२०० रुपये मिळला आहे. गाजर या फळ भाजीची आवक ४६८ क्विंटल झाली असून प्रति क्विंटल १५०० ते २५०० रुपये भाव तर सरासरी भाव २००० रुपये मिळला आहे.

तसेच टोमॅटो या फळभाजीला १०० ते ३२५ भाव तर सरासरी २२० रुपये भाव भेटला आहे. तसेच वांगी या फळभाजीला १०० ते २१० भाव तर सरासरी १५० रुपये भाव भेटला आहे. तसेच फ्लॉवर या फळभाजीला ८० ते १४० भाव तर सरासरी १२० रुपये भाव प्रति १४ किलोस भेटला आहे. तसेच कोबी या फळभाजीला १३० ते २३५ भाव तर सरासरी १८० रुपये भाव प्रति २० किलोस भेटला आहे. तसेच ढोबळी या फळभाजीला १५० ते २५० भाव तर सरासरी २२० रुपये भाव प्रति ९ किलोस भेटला आहे.

वेलवर्गीय भाजीपाला मध्ये पाहायला गेले तर भोपळा या भाजीला १०० ते १२५ रुपये तर सरासरी भाव १७० रुपये आहे, कारले या भाजीला १२५ ते २२० रुपये तर सरासरी भाव ११५ रुपये आहे, गिलके या भाजीला २५० ते ४०० रुपये तर सरासरी भाव ३२५ रुपये आहे, दोडका या भाजीला ३०० ते ६०० रुपये तर सरासरी भाव ४५० रुपये प्रति १२ किलोस भेटला आहे. काकडी ला १२५ ते २७५ रुपये तर सरासरी भाव १७५ रुपये प्रति २० किलोस मिळाला आहे.

English Summary: Large inflow of pomegranate in the market committee, price under pressure Published on: 21 July 2021, 07:02 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters