News

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी फारच अडचणीत आला आहे. बाजारभाव, अतिवृष्टी, महागाई यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. असे असताना आता दुधाला एफआरपी (Milk FRP) लागू करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी सातत्याने करत आहेत. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे किसान सभेने (Kisan Sabha) म्हटले आहे.

Updated on 26 August, 2022 3:05 PM IST

गेल्या काही दिवसांपासून शेतकरी फारच अडचणीत आला आहे. बाजारभाव, अतिवृष्टी, महागाई यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. असे असताना आता दुधाला एफआरपी (Milk FRP) लागू करावा, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी सातत्याने करत आहेत. मात्र राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे किसान सभेने (Kisan Sabha) म्हटले आहे.

यासोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे देखील हाल सुरू आहेत. कारखानदार आणि मंत्री संगनमताने ऊस एफ.आर.पी. चे (Sugarcane FRP) तुकडे पाडण्याचे मनसुबे रचत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्याचा ठराव किसान सभेने घेतला आहे.

यामुळे या प्रशांवरून येणाऱ्या काळात मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. आता सांगली जिल्ह्यातील मिरज येथे किसान सभेचे जिल्हा अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला किसान सभेचे राज्याचे अध्यक्ष किसन गुजर (Kisan Gujar), राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले (Ajit Nawale) आणि राज्य कोषाध्यक्ष उमेश देशमुख उपस्थित होते.

आर्थिक नियोजन करावं ते दादांनीच! कोरोनात अजित पवारांचे अचूक नियोजन, कॅगकडून कौतुक

यावेळी शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी काय निर्णय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष तीव्र करण्याची भूमिका किसान सभेने घेतली आहे.

तसेच शेतकरी राज्यातील देवस्थान इनाम वर्ग 3 च्या वक्फ बोर्डाच्या (WaqfBoard) जमिनी (Agriculture Land) शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी देखील करत आहेत, मात्र याचा देखील निर्णय अजून झाला नाही. या प्रश्नांवर सरकार लक्ष देत नाही.

धक्कादायक! पतीला परदेशी महिलेसोबत पाहून पत्नीला आला राग, आधी खून आणि नंतर बिर्याणी बनवून..

सध्या राज्यात अनेक ठिकाणी मोठा पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना केवळ पोकळ आश्वासन देऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात दहीहंडी फोडण्यात व्यस्त आहेत. राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत.

शेतकऱ्यांचा हक्काचा जोडीदार! आज बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच बैलपोळा, वाचा या दिवसाचे महत्व..

त्यामुळे किसान सभा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक पावित्रा घेणार आहे, अशी माहिती किसान सभेच्या वतीने अधिवेशनात देण्यात आली. यामुळे हे प्रश्न येणाऱ्या काळात पेटणार आहेत. आता सरकार काय निर्णय घेणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
ब्रेकिंग! राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबत युती..
शरद पवारांच्या नातीचा परदेशात डंका! युरोपमध्ये घुमणार बारामतीचा आवाज, बातमी वाचून कराल कौतुक..
ई-वाहनांवर सबसिडी योजनेबाबत केंद्राचा मोठा निर्णय, नवीन नियम 1 सप्टेंबरपासून लागू होणार..

English Summary: lands of Devasthan Board state given the farmers? Aggressive farmers
Published on: 26 August 2022, 03:05 IST