निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक वेगवेगळी आवाहने उभा राहिला आहेत अश्याच काळात गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावच्या शेतकरी वर्गाकडे खूप मोठे संकट उभा राहील आहे. महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावाच्या शेतकऱ्यांचे नुकसान हे तेलंगणा येथील मेडीगट्ट या प्रशासनाच्या भोंगळ्या कारभारामुळे झालेले आहे. तेलंगणा सरकारच्या दुर्लक्ष पणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.
निसर्गाचा लहरीपणा आणि प्रशासन:-
गेल्या 2 वर्षांपासून राज्यात ऐन हंगामाच्या काळात अवकाळी पाऊस पडत आहे आणि शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे अनेक पिके पाण्याखाली गेली त्यामुळे उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. अश्या काळात शेतकरी वर्गापुढे वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. गेल्या 3 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावातील शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे.तेलंगणा मधील धरणाच्या पाण्याला वहिवाट करून दिल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावातील जमिनी वाहून गेल्या आहेत. तेलागणा मधील धरणाचे पाणी थेट शेतामध्ये शिरत असल्यामुळे त्या जमिनी नापीक होऊ लागल्या आहेत शिवाय त्यातून उत्पन सुद्धा कमी प्रमाणात निघत आहे. तसेच सतत पानी साचल्यामुळे जमिनीचा आणि मातीचा कस आणि समतोल बिघडू लागला आहे. गेल्या 3 वर्षे काळापासून शेतकरी वर्गाचे अश्या प्रमाणात हाल होत आहे. तसेच शासनाने यावर मार्ग काढावा यासाठी शेतकरी मागणी करत आहेत.
तेलंगणा मधील धरणाच्या पाण्याला वहिवाट करून दिल्यामुळे जमिनी वाहून जाऊ लागल्या आहेत तसेच सतत पाणी साचल्याने जमिनीत क्षाराचे प्रमाण वाढून जमिनी नापीक बनल्या आहेत. मेडीगट्टा धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत येत आहे आणि जमिनी नापीक बनत आहेत आणि उत्पन्न पण निघत नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. त्याअनुशंगाने मदत तर नाहीच पण प्रशासनाकडून कोणतेही सर्वेक्षणही झालेले नाही.तेलंगणा राज्यातील मेडीगट्टा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 25 गावांच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामध्ये गुमलकोंडा , मुकडीगुटटा , मुत्तापूर माल , मुत्तापूर चेक , टेकडामोटला , सुंकरअली , असरअल्ली , गोल्लागुडम माल , बोराईगुडम , गेर्रापल्ली , जंगलपल्ली , बालमुत्यमपल्ली , अंकीसा , लक्ष्मीदेवपेठा , कंबलपेठा , चिंतारेवला , नडीकुडा , कोत्तापल्ली , पोचमपल्ली , रंगधामपेठा , गंजीरामन्नापल्ली या गावांचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून या जमिनीत काहीच उगवत नसल्याने शेतकरी नाराज आणि हताश झाले आहेत.
भाजप पदाधिकारी यांचे तहसीलदारांना निवेदन:-
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील अनेकांच्या जमिनी धरणाच्या पाण्यामुळे वाहून गेल्या आहेत. तसेच उर्वरित जमिनीत सतत पाणी असल्याने त्या जमिनी क्षारयुक्त बनल्या आहेत. त्यामुळे जमिनीचा दर्जा कमी झाला असून त्यातून अजिबात उत्पन मिळत नाही. येथील शेतकरी वर्ग त्याच जमिनीवर आपले पालनपोषण करत असल्यामुळे सध्या 3 वर्षांपासून त्या जमिनीत काहीच न पिकल्यामुळे आता त्या शेतकरी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे तसेच या मध्ये शासन सुद्धा यामध्ये लक्ष घालत नाही. शासन या मध्ये लक्ष घालत नसल्यामुळे शेतकरी वर्गाच्या हितासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन देऊन शेतकरी वर्गाला मदत करण्याचे सांगितले आहे.
Published on: 21 February 2022, 07:42 IST